आष्टी प्रतिनिधी
प्रत्येकाचा बँकेसी संबंध येतो.आर्थिक देवाण-घेवाण करताना काही दस्तावेजांची पूर्तता महत्त्वाची असते.फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड पूर्ती सीमित नसते.तेव्हा इतर दस्तावेजासाठी अडचणी उभ्या राहतात.गृहकर्ज,वाहन कर्ज,व्यवसाय कर्ज, शैक्षणिक कर्ज अशा अनेक आवश्यकता साठी,आम्ही आणि आमचे सर्व संबंधित कर्मचारी मार्गदर्शन करू.गरजूंच्या अडचणी निश्चित सोडवू.असे एस.बी.आय.बँकेचे मॅनेजर सुयोग वाजे यांनी सांगितले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ऍडव्होकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या अध्यक्षतेखाली,अडचणी मार्गदर्शनात बँक मॅनेजर सुयोग वाजे बोलत होते.यावेळी त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपप्राचार्य अविनाश कंदले,प्रा.अशोक भोगाडे,प्रा.सचिन कल्याणकर,प्रा.संजय भांडवलकर,प्रा.संजय कोल्हे,प्रा.चंद्रकांत कोकणे,प्रा.वाल्मीक बन,प्रा.रोहिणी कांबळे,प्रा.मनीषा देवगुडे,प्रा.सायली हंबर्डे,डॉ.अंबादास शिरावळे,प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,प्रा.दादा साप्ते,प्रा.छगन घुले,बँक कर्मचारी संदीप हंबर्डे उपस्थित होते.