सिंधीकाळेगाव/प्रतिनिधी
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषानुमुळे यंदा बैला पोळा सन घरीच केला साजरा .पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना खांदीमळ केली जाते व दुसर्या दिवशी बैलांना तलाव किंवा पानवठ्यावर नेऊन स्वच्छ धुवुन, काढले जातात. नंतर बैलांच्या शिंगाना हिंगुळ मारतात चमकी, बाशींग, अंगावर झुला टाकतात नंतर गावात हनुमानाला नारळ फोडुन शेतीमध्ये देवांना नारळ फोडतात .व चार वाजेदरम्यान बैलांला मारोतीच्या दर्शनाला नेतात. बैलांना घरी आल्यावर बैलांची पुजा केली जाते. तसेच बैलांना पुरण पोळीचा नैवद्य दाखवला जातो.
जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे बैलपोळा साजरा करतांना शेतकरी
छायाचिञ(शाम गिराम सिंधीकाळेगाव)