गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुका शिक्षक सहकारी पत संस्थेचे कर्मचारी दादासाहेब (बाळासाहेब )विश्वनाथराव खंडागळे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.ट्रस्ट) संस्थेच्या वतीने दिनांक 06/06/2022ला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मुंबई येथे सन्मानित करण्यात आले होते याचं संस्थेच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रातील 51 जणांना अति उत्कृष्ट काम केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्काराने बॅकाॅक थायलंड मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे या मध्ये बीड जिल्ह्यातुन गेवराई येथील दादासाहेब (बाळासाहेब )विश्वनाथराव खंडागळे यांची सहकार क्षेत्रात थकबाकी वसुलीचे काम अति उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय आदर्श सहकारी संस्था/पत संस्था सेवारत्न पुरस्कार 2022 मिळाल्यामुळे ते खूप आनंदीत आहेत त्यांनी काम करत असताना उन,वारा, पाऊस कश्याचीही तमा न बाळगता सतत अहोरात्र काम केले कधी कधी मोटारसायकल वर 400किलो मिटरचा प्रवास सुध्दा केला त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले या पुरस्कारामुळे त्यांना परदेशात जाण्याची संधी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थे मुळे मिळाल्यामुळे व पुरस्कारासाठी निवड केल्यामुळे धन्यवाद देऊन आभार मानले . पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्थरातुन त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.