प्रल्हाद भुते यांचे अल्पशा आजाराने निधन
-----------------------
गेवराई ( प्रतिनिधी ) शहरातील रहिवासी असलेले प्रल्हाद गंगाराम भुते यांचे शनिवार दि.10 रोजी सकाळी 10 च्या सुमारास राहात्या घरी अल्पशा आजाराने निधन. निधन समयी त्यांचे वय 62 वर्ष होते.
शहरातील प्रल्हाद गंगाराम भुते यांची काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. शनिवार दि.10 रोजी सकाळी 10 च्या सुमारास त्यांना देवाज्ञा झाली. निधन समयी त्यांचे वय 62 वर्ष होते. त्यांच्यावर शहरातील चिंतेश्वर स्मशान भुमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखात नातेवाईक, मित्र परिवार सहभागी झाला होता. प्रल्हाद भुते यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पाच नातवंड असा परिवार आहे. या घटनेमुळे भुते परिवार दुःखाचा डोंगर कोसळा असून यामध्ये दैनिक महाभारत व सा प्रकाश आधार परिवार सहभागी आहे.