हंबर्डे महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतर विद्यापीठ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
आष्टी प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे दि.०३ ते ०७ डिसेंबर २०२२ दरम्यान झालेल्या "क्रीडा महोत्सव"आंतर विद्यापीठ स्पर्धा-२०२२ या नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण २२ विद्यापीठांचा समावेश होता.पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद कबड्डी मुलींच्या संघात अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या कु.आरती ससाणे कु.नम्रता सोनवणे कु.हर्षाली थोरात कु.रिमा चव्हाण चार खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर,आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.उपांत्य फेरीत बलाढ्य अशा एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबई यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम फेरीत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या सोबत झालेल्या रोमहर्षक सामन्यात २८ विरुद्ध २९ आशा अटीतटीच्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे संघ प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद कबड्डी संघात अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालाययाच्या चार खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी करून संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.या खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख डॉ.संतोष वनगुजरे यांचे मार्गदर्शन लाभले विजयी खेळाडूंचे अभिनंदनआष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.किशोर नाना हंबर्डे सर्व सन्मानीय संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे उपप्राचार्य श्री.बाबा मुटकुळे श्री.अविनाश कंदले पर्यवेक्षक श्री.अशोक भोगडे कार्यालयीन अधीक्षक श्रीमती जाधव मॅडम महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद सर्वांनी विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.