महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

सय्यद अल्लाउद्दीन यांच्या बाल कवितेची एशियन पोएट्री साठी निवड

सय्यद अल्लाउद्दीन यांच्या बाल कवितेची एशियन पोएट्री साठी निवड                                              

 आष्टी प्रतिनिधी 

 आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयातील कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या.... एक गाव पाण्यासाठी चंद्रावर गेले.... या बाल कवितेची एशियन पोएट्री साठी निवड झाली आहे.आशियाई देश विविध संस्कृती,भाषा साहित्याने समृद्ध आणि संपन्न आहेत.येथील विविध प्रकारच्या कविता मानवी मूल्य,संस्कृती आणि जीवनाचे तत्त्वज्ञान उलगडताना दिसतात.त्या त्या देशांची आणि भाषांची संस्कृती,सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी या कवितांनी महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसतो.भाषा अनुवादित होताना सर्व भाषांमधील कवितांचा एकमेकांना परिचय होऊन कवींना जागतिक व्यासपीठ मिळावे,किंबहुना कवितेची योग्य समीक्षा व्हावी.या उद्देशाने प्रख्यात अंतरविद्याशाखीय संशोधक,समीक्षक आणि अमूर्त सांस्कृतिक वारशाचे अभ्यासक डॉ.साहेब खंदारे यांनी प्रकल्पाचे संचालक या नात्याने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.कवी सय्यद अल्लाउद्दीन यांचे झिंदाबाद..मुर्दाबाद,उचल कोयता तोडीला,अजून मारेकरी सापडत नाही या प्रौढ साहित्य कविता संग्रहाची पुस्तके प्रकाशित असून,बाल साहित्यातही त्यांची भरीव कामगिरी आहे.बबलू छबलू,आई माझी नातवांची आजी हे दोन बालकविता संग्रह,आणि अंगठे बहाद्दर झिंदाबाद,बाप पिकवितो घास,त्याला गळफास,आई तुझं लेकरू या तीन बालनाटकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे.साहित्य अकादमीने त्यांच्या अनुवादित कविता अनुवादासह सादर करण्यासाठी त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिले.युट्युबच्या माध्यमातून त्यांची ही कविता 150 देशात पोहोचली आहे.एशियन पोएट्री निवडी