महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

विद्यार्थ्याने कोणतेही कार्य सकारात्मक विचाराणे पूर्ण करावे कॅप्टन- एस.पी. सूर्यवंशी

विद्यार्थ्याने कोणतेही कार्य सकारात्मक विचाराणे  पूर्ण करावे 
कॅप्टन- एस.पी. सूर्यवंशी

 गेवराई (प्रतिनिधी) 
आर. बी.अट्टल महाविद्यालय गेवराई एन.सी.सी. विभागा च्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची गेवराई या शाळेचे एन.सी.सी.विभाग प्रमुख कॅप्टन- एस.पी. सूर्यवंशीसर यांचा नुकतेच सेवानिवृत्त झाल्यामुळे तसेच एन.सी.सी छात्रांची दिल्ली प्रशिक्षणासाठी निवड झाल्यामुळे एन. सी.सी.(N.C.C.)

 विभागा मार्फत त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर. बी. अटल महाविद्यालयाचे प्राचार्या डॉक्टर रजनी शिखरे मॅडम यांच्या हस्ते कॅप्टन- एस. पी. सूर्यवंशीसर यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना कॅप्टन- एस.पी. सूर्यवंशी सरांनी एन.सी.सी.छात्रांना मार्गदर्शन करताना-- विद्यार्थ्याने कोणतेही कार्य सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पूर्ण केले पाहिजे यश निश्चित मिळते. यश मिळवण्यासाठी खूप कष्ट व सातत्य ठेवले पाहिजे व तसेच शिस्तीचे कठोरपणे पालन केले पाहिजे,जीवनात निर्व्यसनी बणा व्यसन आहारी जाऊ नका.कष्ट करण्याचे नेहमी तयारी ठेवावी विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळतच राहील. अपयशाने खचून जाऊ नका अपयश हे यशाची पायरी नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारावा त्यांनी स्वतःचे शालेय व  एन.सी.सी. चे विद्यार्थी दशेतले अनुभव सांगितले. महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत ते वर्ग प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे एनसीसीमुळे विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्याचे धाडस व साहस निर्माण होते. महाविद्यालयाबद्दल बोलताना म्हणतात हे महाविद्यालय देशात नावलौकिक मिळवलेले आहे क्रीडा व एनसीसी या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  अनेक पारितोषक मिळवलेले आहे. हे नावलौकिक कायम ठेवावे नवे ते अधिक उंचवावे. विद्यार्थ्यांनी जे काम वाट्याला येईल ते प्रामाणिकपणे पार पाडा त्याचा आनंद समाधान स्वतःस मिळेल, कुटुंब, समाज, देश .याबाबतीत आपल्याकडून खूप अपेक्षा बाळगतात त्या अपेक्षासाठी आपण सजग राहिले पाहिजे व सतत क्रियाशील राहून सामाजिक कार्यासाठी अग्रेसर व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्राचार्यांच्या हस्ते एन.सी.सी.कॅम्प थलसेना नवी दिल्ली  साठी एनसीसी छात्र जूनियर अंडर ऑफिसर धनंजय काळे याची प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल व प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सीनियर अंडर ऑफिसर अजय मोटे करियर कौन्सिलिंग प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे त्याचे हार्दिक अभिनंदन व सत्कार करण्यात आला सत्काराआर्थी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख मेजर डॉक्टर विजयकुमार सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले होते . महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शिखरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे कुटुंबाचे समाजाचे नाव मोठे होईल यासाठी सतत धडपडत राहिले पाहिजे व मोठमोठे स्वप्ने बघितले पाहिजे त्याच्यासाठी अभ्यास, प्रयत्न, कसोशीने कष्ट करण्याची तयारी अधिकारी बनण्याचे स्वप्न मनी बाळगले पाहिजे विद्यार्थ्यांना सैन्य दलातील शिस्तीचे महत्व कसे असते याबद्दल त्यांना आलेला अनुभव त्यांनी विद्यार्थ्यासमोर कथन केला. परीक्षा संदर्भात व तसेच  त्यांना विविध स्पर्धेत यश मिळो यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या याप्रसंगी महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख तथा उप प्राचार्य मेजर डॉक्टर विजयकुमार सांगळे उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत पांगरीकर IQAC समन्वयक डॉक्टर प्रवीण सोनुने यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या  कार्यक्रमासाठी एनसीसी छात्र बहु संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन मेजर सांगळे सर आभार प्रदर्शन सीनियर अंडर ऑफिसर मोटे यांनी व्यक्त केले.