जिद्दी व आदर्श व्यक्तिमत्व संजय (भाऊ ) पुरणपोळे
काम कोणतेही असो ते काम करण्यासाठी भाऊ कधीच मागेपुढे पाहत नाहीत. आणि काम करताना कधीच लाज बाळगत नाही. काम कोणतेही असो ते काम हे कामच आहे हे काम करूनच आपण यशाची शिखरे काबीज करू शकतो ही त्यांची प्रबळ इच्छाशक्ती त्यांना कायमच साथ देत आलेली आहे. आणि या जिद्दीच्या जीवावरच त्यांनी सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी यशस्वी झेप घेतली आहे. हे यश मिळविण्यासाठी भाऊंनी अनेक संकटांचा सामना देखील करावा लागला परंतु ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी कायमच वेळ दिला ,त्यासाठी संघर्ष केला , अपयश पचवले व त्यानंतरच संघर्षातून ते यशस्वी झाले. आणि आपली कार्यकर्तृत्वाची ओळख गेवराई तालुक्यात निर्माण केली . राजकीय क्षेत्रात देखील ते कायमच माजी आमदार अमरसिंह पंडित साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपली कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली आहे जी जबाबदारी साहेबांनी त्यांना दिले त्यांनी प्रामाणिकपणे करत आल्यामुळे पंडित कुटुंबातील ते एक विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे.तर आत्ताच नव्याने सुरू केलेल्या सुपर मार्केट त्यांनी एवढे भव्यदिव्य केले आहे की, हे सुपर मार्केट गेवराई तालुक्याच्या वैभवात भर पडणार ठरले आहे. राजकीय सामाजिक तसेच उद्योग व्यवसायासह त्यांनी नाथ इंटरनॅशनल पब्लिक स्कूल च्या माध्यमातून गेवराई तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणारी संस्था त्यांनी निर्माण केली आहे . तसेच इतर क्षेत्रात त्यांनी शिस्तप्रिय दर्जात्मक आणि कामात कसल्याही प्रकारची तडजोड न करता ते काम पूर्णत्वाकडे नेण्याची त्यांची आगळी वेगळी पद्धत हेच त्यांचे यशाचे पासवर्ड आहे. भाऊंनी अनेक क्षेत्रात काम केले परंतु त्या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवले .व नंतरच त्यांनी यशाची भरारी घेता आली. हे सर्व त्यांनी केले जिद्द आणि मेहनतीने आणि आपल्या बुद्धी कौशल्याच्या जीवावर अनेक नवनवीन योजना आणून व त्या पूर्ण करून एक नाविन्य देण्याचा प्रयत्न ते नेहमीच करत असतात .यावर त्यांनी आपला दर्जेदार आणि विश्वासपात्र ब्रँड निर्माण केला आहे. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा आदर्श भाऊचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होवू हीच आई जगदंबा चरणी आणि दत्त प्रभु चरणी प्रार्थना .
दिपू बंडू आणि संजू ची यारी
++++++++++++++++++++
माणुसकी आणि मैत्री काय असते आणि मैत्री कशी निभावावी लागते याचे आदर्श उदाहरण म्हणजे दिपक( तात्या) आतकरे बंडू(शेठ)मोटे आणि संजू(भाऊ ) हे होय . यांच्या आदर्श मैत्रीची गेवराई तालुक्यात ओळख आहे. यांची मैत्री एकमेकांच्या हिताची, एकमेकाचा आनंद आणि प्रगती आणि सामाजिक कार्य करण्याची व समृद्धी साठी प्रयत्न करून पुढे नेण्याची. राजकारणात माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांच्या राजकारण भक्कम करण्याची, आनंदाच्या क्षणातच नव्हे तर दुःखाच्या प्रसंगीही ढालीचा रूपात समोर उभे राहणे या तिघाच्या मैत्रीचे विशेष गुण आहेत .या तिघांच्या मैत्रीला कुठल्याहि पारड्यात तोलता येत नाही. यांची ही निखळ मैत्री आणि त्यातून मिळणारा आनंद याचं एक या तिघांनी स्वतंत्र वजन निर्माण केले आहे . या तिघांनी देखील मेहनत, जिद्द ,हिम्मत आणि आपल्या स्वकर्तुत्वावर गेवराई तालुक्यात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. हे वर्चस्व देखील कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे . राजकीय क्षेत्रात ते माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे कट्टर समर्थक तसेच शिवछत्र परिवारातील एक विश्वासू सदस्य म्हणून त्यांनी आपली ओळख तयार केली आहे .गेवराई तालुक्यात कुठेही ती एकसंघ होऊन सामाजिक कार्य करत असतात त्यामुळे गेवराई तालुक्यात त्रिदेव म्हणून देखील त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तरुणांनी या तिघांच्या मैत्रीचा आदर्श घ्यावा अशी यांची मैत्री. अशा मैत्रीला माझा खणखणीत सलाम .
जय महाराष्ट्र
प्रदीप जोशी
दैनिक सामना तालुका प्रतिनिधी गेवराई
94 22350201