महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आष्टी पिंपळेश्वर इंग्लिश स्कूलच्या संघाची जिल्ह्यात बाजी.

हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आष्टी पिंपळेश्वर इंग्लिश स्कूलच्या संघाची जिल्ह्यात बाजी. 


आष्टी प्रतिनिधी :
दिनांक 19 नोव्हेंबर रोजी बीड या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत पिंपळेश्वर इंग्लिश स्कूलच्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावून बाजी मारली आहे.
यावेळी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. किशोर नाना हंबर्डे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
तसेच यावेळी एडवोकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य निंबोरे सर यांनी आणि पिंपळेश्वर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या साै. पवार मॅडम यांनी यशस्वी संघाचे अभिनंदन व कौतुक केले. स्पर्धा यशस्वी पार करण्यासाठी क्रीडा शिक्षक समीर शेख सर तसेच जाधव सर यांनी कार्य केले. सदरील संघामध्ये खालील विद्यार्थ्यांनींचा सहभाग होता.कस्तूरी बिरंगळ, ईश्वरी पोकळे,  सूर्या गायकवाड ,आकांक्षा पवार, श्रुती ढोबळे, समृद्धी वाल्हेकर ,पूर्वा श्रीखंडे, दिव्यांका निकाळजे, साक्षी नरवडे, श्रेया पवार,मुग्धा डहाळे,वेदिका भवर,अनुजा गर्जे.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य सोै. पवार मॅडम यांनी माहिती दिली की स्कूलचा क्रिकेटचा संघ देखील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे तसेच बुद्धिबळ स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झालेली आहे.