भारत जोडो यात्रेत अँड श्रीनिवास बेदरेनी साधला राहुल गांधीशी संवाद
गेवराई ( प्रतिनिधी ) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची बहुचर्चित कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये दाखल झाली असता बीड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड श्रीनिवास बेद्रे या यात्रेत सहभागी झाले. व त्यांनी राहुलजी गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रा मध्ये महाराष्ट्रातील ३८२ किलोमीटर ची पायी पदयात्रा यशस्वी पणे पूर्ण केली या दरम्यान, त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला.
या चर्चा अँड श्रीनिवास बेदरे यांनी आपण पक्षा मध्ये बीड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले यावेळी गांधींनी श्रीनिवास बेदरे याच्याशी व्यक्तिगत माहितीची आस्थेने चौकशी केली,अँड श्रीनिवास बेदरेनी राहुल गांधी याच्या सोबत प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील भ्रष्टाचार, शेतीशी संबंधित प्रश्न तसेच सामान्य कुटुंबातील युवक राजकारणात येत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांना सांगितल्या. अनेक विषयावर सुरक्षितपणे साक्षीतपणे चर्चा केली. पक्षांमध्ये कार्यरत असताना राहुल गांधींची प्रथमच भेट झाली आणि राहुल गांधी हे प्रचंड दूरदृष्टी असल्याने व कार्यकर्त्यावर प्रेम करणार नेते आहेत, याची प्रचिती संवाद दरम्यान आल्याची भावना अँड श्रीनिवास बेद्रे यांनी व्यक्त केली, शेवटी राहुल गांधी यांनी 'आप को मेरे से क्या उम्मीद है ? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला असता
अँड श्रीनिवास बेद्रे यांनी आपण देशाचे नेतृत्व करावं आणि सर्वसामान्य कुटुंबातील युवक जे पक्षासाठी काम करणाऱ्या युवकांना बळ दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.यावर गांधींनी तुमच्यासारखा तरुणांची पक्षाला व मला गरज आहे, आपण काम करत राहा मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे,अशी भावना व्यक्त केली.