स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात गेवराई पालिकेचा दिल्लीत गौरव ; देशातील १३६ उत्कृष्ठ पालिकांमध्ये मिळवले स्थान
-----------------------
गेवराई (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शहर स्वच्छ व सुदंर केल्याबद्दल गेवराई नगर पालिकेचा दिल्ली येथे भव्य गौरव करण्यात आला आहे. देशातील १३६ पालिकांमध्ये गेवराईने स्थान पटकावले आसून देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छ सर्वेक्षण २०२१-२२ राबविण्यात आले होते. यामध्ये २५ ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात गेवराई पालिकेचा समावेश होता दरम्यान या स्वच्छ सर्व्हेक्षण मध्ये भाग नोंदवून गेवराई नगर परिषदेने उत्कृष्ट कार्य करत देशातील १३६ पालिकांमध्ये स्थान पटकावले.
दरम्यान गेवराईचे तत्कालीन व बीडचे विद्यमान मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी व युवा नेते बाळराजे दादा पवार यांच्या प्रेरणेने व आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर व सर्व नगरसेवक, कर्मचारी यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून ते कृतीत उतरवले. यामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्यासह गांडूळ खतांची निर्मिती प्रकल्प, शौचालयांसह इतर स्वच्छतेची कामे मार्गी लाऊन उत्कृष्ट काम केले. याचीच दखल घेत गेवराई पालिकेचा उत्कृष्ट पालिका म्हणून राष्ट्रपतींच्या वतीने हा भव्य, दिव्य गौरव झाला या कार्याबद्दल आ.लक्षण पवार, बाळराजे दादा पवार, सौ.गीताभाभी पवार यांच्यासह आदींनी या सर्व टीमचे अभिनंदन करत तोंडभरून कौतुक केले. दरम्यान दि.01 ऑक्टोबर 2022 रोजी तत्कालीन मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्यासह गेवराईचे माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, विद्यमान मुख्याधिकारी विशाल भोसले, युवा नेते शिवराज पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्याबद्दल पूर्ण टिमचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.