गेवराई - (प्रतिनिधी ) - तलवाडा सर्कल मधील राहेरी येथील शेतकरी लक्ष्मणराव शेषराव लाड यांचा ऊस विद्युत महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे पेटला गेला आहे व शेतकऱ्याचे दोन एकर ऊस जळून नुकसान झाले आहे. ऊस पेटला तरी वीज महावितरणचे कर्मचारी - अधिकारी पंचनामाला शेतात आले नाहीत. आधीच जादा पावसामुळे शेतकऱ्याचे कापूस व सोयाबीन पीक वाहून गेले. आता शेतकऱ्यांनी करायचे काय? लाखो रुपयांचे नुकसानीला जबाबदार कोण ? या जळित प्रकरणामुळे शेतकरी पार कोलमडून गेला आहे. वीज मंडळाच्या इंजिनियर आणि कर्मचाऱ्यांना वेळोवेळी निवेदने दिली हात जोडले पण त्याचा काही परिणाम झाला नाही. त्याचाच परिणाम मोठ्या प्रमाणावर वाढ झालेला ऊस जळून खाक झाला आहे. तहसील प्रशासनाने सदर घटनेचा पंचनामा करून पीडित शेतकर्याला दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी लक्ष्मणराव शेषराव लाड यांनी केली आहे.