अनंतशांतीकडून राज्यस्तरीय शाहू पुरस्कारांचे कोल्हापुरात वितरण
कुडूत्री(प्रतिनिधी)
राजर्षि शाहू महाराजांच्या कतृत्वाने साकारलेल्या शाहुनगरीत अनेक प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच समाजातील सामाजिक कार्यकर्ते आपले काम पार पाडत असतात अशा विविध श्रेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना अनंतशांती राज्यस्तरीय राजर्षि शाहूं जीवनगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूर येथे पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हन्ट को बँक कोल्हापूर अद्यक्ष शशिकांत तिवले हे होते.हा कार्यक्रम अनंतशांती संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव व संस्थेच्या अध्यक्ष डॉ.माधुरी खोत यांच्या मार्गदर्शनातून पार पडला.
प्रमुख उपस्थितीतमध्ये सेवा निवृत्त पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील यांच्यासह माजी अध्यक्ष एम. एस. पाटील, माजी उपाध्यक्ष अतुल गणपतराव जाधव, रोहित प्रकाश बांदिवडेकर -कार्यकारी अंभियता कोल्हापूर,अनंतशाती संस्था सचिव अरुणा प्रशांत पाटील अनंतशाती संचालिका प्रार्थना सुरेश शेलार ,अनंतशांती संचालक व पत्रकार युवराज पाटील, सुभाष चौगले, जे. के. गोरंबेकर, रसुल शेख रमेश पाटील सागर लोहार,मनोज माने प्रशांत पाटील आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण पार पडले.
कार्यक्रमात विजय वासुदेव गावडे, बालाजी विजय बरबडे,दिलीप पांडुरंग ठोबंरे, मनोज रामचंद्र शिंदे, गणेशकुमार विनायकराव खोडके, विजय दत्तात्रय पार्टे,अवधुत भगवान पलंगे,शामराव चव्हाण,राजगोंडा शिवाप्पा चौगुले, अरुण महिपती कांबळे, सुभाष काशिनाथ पवार, संग्राम पोवार, लक्ष्मण कृष्णात पाचगावे , प्रताप सुदाम कांबळे,अमित बाळासो कागले, तानाजी रामचंद्र चौगुले,शंकर मारुती चेचर, शितल सुरेंद्र शिरसाठ आदींना पुरस्कार देण्यात आले.कार्यक्रमाचे सुंत्र संचालन व आभार प्रदर्शन मल्हारी महादेव लोखंडे यांनी केले