मानवत येथील सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयाचा यशात मानाचा तुरा
राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत कु. रूपाली साहेबराव पवार, कु. शीतल हनुमान वावरे विदयार्थीनीची निवड
मा. राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराचे होणार वितरण
________________________________
मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील सरस्वतीबाई भाले पाटील येथील कु. रूपाली साहेबराव पवार, कु. शीतल हनुमान वावरे या दोन विदयार्थीनीची दि. २ मार्च ते ४ मार्च २०२२ या कालावधीत महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद येथे झालेल्या राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत परभणी जिल्ह्यातुन मानवत येथील श्रीमती सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयातील विद्यार्थिनी निवड झाली परभणी जिल्ह्यातून या दोनच विदयार्थीनीना गाइड राज्य पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांना महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे त्यांना श्रीमती सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयातील गाईडर श्रीमती नाजीमा शेख व जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईडर विद्या लटपटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशा बद्दल त्यांचे श्रीमती सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. अॅड. मुंजाजी भाले पाटील, मुख्या ध्यापक श्री. भारत मांडे, प्रकाश रासवे, ज्ञानेश्वर रेंगे, आनंद नांदगावकर, नागनाथ लहाने, गणेश अतकरे,किशन भिसे, गणेश टेंगसे, श्रीमती राठोड मॅडम, यांच्या सह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व शिक्षण क्षेत्रातुन या विदयार्थीनीचे अभिनंदन केले जात आहे.
***