चोरीच्या प्रयत्नात असणारे चोरटे आले पोलिसांच्या जाळ्यात..!
गेवराई ( प्रतिनिधी ) चोरीच्या तयारीत असलेले चोर पोलिसांना बुधवार दि.29 रोजी शहरातील मोंढा नाका परिसरात दिसताच, सदरील चोरट्यांना पकडून त्यांच्या विरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी मिळालेली माहिती अशी की, बुधवार दि.29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांची गस्त चालू असताना शहरातील मोंढा नाका परिसरात तीन युवक संशयस्पद रित्या फिरताना आढळून आले असता त्यांची चौकशी केली. तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी त्यांची झाडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य व शस्त्र मिळून आले. त्यामुळे चोरी च्या उद्देशानेच फिरत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. यामध्ये दत्ता जालिंदर शिंदे ( वय 24 वर्षे ) राहणार शिदोड तालुका जिल्हा बीड, ऋषिकेश गोकुळ कुटाळे ( वय 22 वर्षे ) राहणार जिरेवाडी तालुका जिल्हा बीड यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात 318/2022 नुसार कलम 393 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली
डी.बी.पथकाचे प्रमुख प्रफुल्ल साबळे यांनी केली असून त्यांच्या समवेत पोलीस हवालदार कृष्णा जायभाय, पोलीस शिपाई राठोड यांनी केली आहे.