आ.ॲड.लक्ष्मण आण्णा पवार साहेब यांना मंत्रिमंडळ सामील करून घ्या:- दशरथ पंडित.
--------------------------------
गेवराई प्रतिनिधी:- गेवराई विधानसभा मतदारसंघाचे दोन टर्म आमदार,गेवराई पंचायत समितीवर निर्वाधित वर्चस्व, गेवराई नगरपालिका पूर्ण ताब्यात,जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाकडे बारकाईने लक्ष, कोविड काळात आरोग्य विभागावर बारकाईने सतर्क राहून कोविड काळ हाताळला,गेवराई मतदार संघातील राशन,वाळू यावर कर्तव्यदक्ष राहून कारभार पाहुन सामाजिक क्षेत्रातून पुरस्कार प्राप्त तसेच त्यांना पुणे येथील एनजीओ ने आदर्श आमदार पुरस्काराने गौरवले,पक्षनिष्ठा व पक्षाचे आदेश एक निष्ठेने स्वीकारत पक्षाचे काम पूर्णपणे इमानदारीने करणारे दमदार आमदार आ.ॲड. लक्ष्मण (आण्णा) पवार साहेब यांना मंत्रिमंडळात सामील करून घ्यावे अशी मागणी गेवराईतील तरून मंडळी करत आहे.बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील मुलभुत विकास करण्यासाठी नव्या सरकार कडे आ.ॲड. लक्ष्मण (आण्णा) पवार साहेब यांच्या स्वरूपात मंत्रिपदाची अपेक्षा गेवराई परिसरातील नागरिक करत आहेत. आपल्याला बीड जिल्ह्यात विकासात भर करण्याची इच्छा आ.ॲड.लक्ष्मण (आण्णा) पवार साहेब यांनी खुप वेळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे.त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांच्या आणि सर्व सामान्य माणसाच्या अडचणी सोडवणारा तसेच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कार्यसम्राट नेता बीड जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर त्यांचे शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावरील आंदोलने खूप गाजली आहेत. नक्कीच आ.ॲड.लक्ष्मण आण्णा पवार साहेब यांना मंत्री पद दिले तर मराठवाड्याच्या विकासात खुप मोठी भर पडेल अशी भावना भाजपा सोशल मीडिया प्रमुख तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळ बीड जिल्हा सरचिटणीस दशरथ पंडित यांनी व्यक्त केली.