गेवराई तालुका वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्षपदी बंटी सौंदमाल
--------------------------------------
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई तालुका वंचित बहुजन युवा आघाडी चे अध्यक्ष पदी बंदी सौंदरमाल यांची नियुक्ती करण्यात आली
जिल्हा परिषद नगर परिषद ,पंचायत समिती, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर आल्याने वंचित बहुजन युवा आघाडीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या संघटनात्मक ,बांधणी, तसेच पक्ष वाढीच्या उद्देशाने आपला पक्ष नव्याने, उंचीवर नेण्यासाठी जोमाने काम करणार्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना, नविन कार्यकारणी संधी देऊन त्यांना सक्रिय सहभागी व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशावरून गेवराई तालुका वंचित बहुजन युवा आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारणीत गेवराई तालुका अध्यक्ष विनोद उर्फ बंटी सौंदरमल तर उपाध्यक्ष सुधाकर केदार, अतुल गायकवाड, विनोद डोईफोडे, विशाल आठवले तर महासचिव गौतम वाव्हळ यांची निवड करण्यात आली असून सचिव म्हणून राहुल भोले धम्मा त्रिभुवन व सहसचिव प्रवीण सरपते, भैय्यासाहेब वाव्हळ संघटक म्हणून रमेश ससाने तर सहसं संघटक म्हणून बाबासाहेब भुक्तर, नितीन प्रधान यांची निवड करण्यात आली आहे