गेवराईच्या संजय एजन्सी येथे धाडसी चोरी
----------------------------------------
चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले
शुभम घोडके/गेवराई
गेवराई ( प्रतिनिधी) शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कोल्हेर रोड भागात सोनी बंधु यांचे संजय एजन्सी व किराणा सुपर शॉपी येथे धाडसी चोरी काल बुधवारी रात्री झाल्याचे उघड झाले आहे. चोरट्यांनी दुकानाच्या मागे असलेल्या पत्रे उचकटून महागडा वजन काटा, आसाम पत्ती (तीस किलो), भारी कॅडबरी, पतंजली सामान,तुपाचे डब्बे , किरकोळ डेली सामान या सारखे दुकानात असलेले किरकोळ सहित्य असा माल दुकानातुन लंपास केला. ही चोरी करताना दुकानाच्या मागे असलेला दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला व दुकानावरील पत्रे उचकुन या चोरीत जवळपास सत्तर हजार रुपयांचा माल चोरीला गेल्याची माहिती दुकान मालक सोनी यांनी दिली . याप्रकरणी गेवराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असुन गेल्या काही दिवसांपासून गेवराई शहरात चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरु आहे .अशा घटना घडू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.