जातेगाव ते जातेगाव फाटा डगरी कमी करून खड्डे बुजवण्याच्या आश्वासनानंतर जातेगाव चे उपोषण मागे..!
जातेगाव :
गेवराई तालुक्यातील जातेगावातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले होते. यामुळे सातत्याने अपघात होत होते, व निरपराध नागरिकांचा बळी जात असतो. सध्या स्थितीला जातेगाव ते जातेगाव फाटा २२२ राज्य महामार्गावर नेमके उतारालाच खड्डेच खड्डे झाले होते हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठीं ६ जुलै पर्यंत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करा म्हणून उपोषणाचा इशारा जातेगावकरांनी दिला होता, न झाल्यास रस्त्यालगत उत्तरालाच असलेल्या खड्ड्यात आमरण उपोषणाचा इशारा ०७-०७-२०२२ गुरुवार रोजी दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, भोरे, मैदाड यांनी प्रत्यक्ष उपोषणास्थळी जाऊन उपोषण कर्त्यांची भेट घेतली आणि दिनांक ३०/०७/२०२२ पर्यंत काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर, व त्यांची लेखी घेऊन उपोषण मागे घेतो असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. जातेगाव ते जातेगाव फाटा 222 राज्य महामार्गावर चढ आणि उत्तराच्या ठिकाणीच खड्डे पडून रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या पूर्णपणे खराब झाल्या होत्या. हा रस्ता असाच पुढे नाथापूर पर्यंत पूर्णपणे खराब झालेला आहे. याच रस्त्याने इतर वाहतुकीसोबत कारखान्याचे ऊस वाहतूक सुरू असते. त्या काळात अपघाताचे प्रमाण वाढत असते, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी उपोषण केले होते यावेळी उपोषण करते दत्ताभाऊ वाघमारे, राष्ट्रीय गोर परिषदेचे प्रांतध्यक्ष प्रा. पी. टी. चव्हाण, पॅंथर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धम्मपालजी कांडेकर, सरपंच सतीश चव्हाण, उपसरपंच रामेश्वर पवार, डॉ. जीवनकुमार राठोड, डॉ. रामेश्वर चव्हाण, डॉ. विलास चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य विलास चव्हाण, अभय पांढरे, अमोल धोंडरे, विजयसिंह यमगर, जानू पवार, सत्यप्रेम पवार, ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कारके, छगन पवार, गणेश पवार, गणेश भिकारी, बाळासाहेब चव्हाण, अजय डोंगरे, पत्रकार कालिदास काकडे, गोपाल चव्हाण, भागवत ढोरमारे, देवराज कोळे, संदिपान कारके, अमोल कारके, श्रीमंत चांभारे, संतोष कारके, नागेश कारके, जनार्दन पवार, नारायण कारके, आर आर आबा, भरत बादाडे, प्रतिश सराटे, सुजित पवार, संजय चव्हाण, विलास भिकारी, शिवाजी मिसाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट...
जातेगाव तालुका गेवराई येथील त्या तीन चढावरील चढ कमी करण्यासंदर्भात जातेगावकरांनी भर पावसात उपोषण एक वाजेपर्यंत सुरूच ठेवले त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग गेवराई यांना जाग येऊन त्यांनी तात्काळ उपोषणकर्त्यांची भेट घेतली व लेखी आश्वासन दिले.