श्रीहरी पवार यांना पितृशोक
---------------------------------------
गेवराई ( प्रतिनिधी) ताकडगाव येथील श्रीहरी पवार यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडिल आणि ज्येष्ठ निष्ठावंत भजनी गायक पेटी मास्टर नारायण (आबा) पवार यांचं आज हद्दविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे ते 55वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना गेवराई येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
ताकडगाव येथील स्मशानभूमीत नारायण पवार यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नारायण पवार यांच्या मृत्यूनंतर वारकरी संप्रदाय या विश्वातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. नारायण पवार यांची जुने टेलर व ज्येष्ठ निष्ठावंत भजनी पेटी मास्तर म्हणून तालुक्यात ओळख होती. त्यांनी सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वारकरी संप्रदायात या क्षेत्रात देखील आपला वावर ठेवला होता. तसेच शेती विषयी त्यांना खूप आवड होती त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली , एक मुल, सुनं, जावाई नातवंडे असा परिवार होतं