महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

मिलिंद तुरूकमारे कास्ट्राईब महासंघाचे नवे जिल्हा कार्याध्यक्ष'

मिलिंद तुरूकमारे कास्ट्राईब महासंघाचे नवे जिल्हा कार्याध्यक्ष'

गेवराई  ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी येथील जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मिलिंद तुरूकमारे यांची कास्ट्राईब महासंघाच्या गेवराई येथे आयोजित बैटकीत निवड करण्यात येऊन यानिमित्त त्यांचा शाल श्रीफळ व नियुक्तपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बी.यु. गोपाळघरे तर प्रमुख अतिथी म्हणून कास्ट्राईब महासंघाचे केंद्रीय महासचिव बापूसाहेब ससाणे, राजर्षी शाहु शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन कपिल डोंगरे, सिने कलावंत तथा इंजिनिअर निळु सावरगेकर, त्वरीता अर्बन चे चेअरमन विजय डोंगरे आदींची उपस्थिती होती. 
याबाबत थोडक्यात वृत्त असे की, कास्ट्राईब महासंघ  या संघर्ष दायी कर्मचारी संघटनेची आत्तापर्यंतची बीड जिल्ह्य़ातील वाटचाल अत्यंत दमदार राहिलेली असुन नजिकच्या भविष्यात अधिक आक्रमक आणि अभ्यासपूर्ण माहिती आधारे विविध कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भुमिका ठेवली असल्याने त्याचाच एक भाग म्हणून गेवराई गटशिक्षण कार्यालयात ज्ये. शि. वि. अ. म्हणून कार्यरत असलेले आणि तालुक्यात दिर्घकाळ गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केलेले, अत्यंत अभ्यासु नेतृत्व म्हणुन ओळख असलेल्या मिलिंद तुरूकमारेंची जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून केंद्रीय महासचिव बापूसाहेब ससाणे यांनी महासंघाच्या कन्या प्रशाला गेवराई च्या सभागृहात तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, साधन व्यक्ती, आणि महासंघाचे विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड केली.
त्यांच्या या निवडीने सर्वांनाच सुखद आश्चर्याचा धक्का बसला असुन कास्ट्राईब च्या या धक्कातंत्राची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
केंद्रीय महासचिव बापूसाहेब ससाणे यांनी याप्रसंगी समयोचित विचार मांडताना कास्ट्राईब च्या आगामी लढ्याची  झलक सांगुन बिंदुनामावली च्या अनुषंगाने आवश्यक असणारी माहिती आता महासंघाला नव्या कार्याध्यक्षांनी पुरवावी, जेणेकरून या आडुन अनेक मागासवर्गीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या  सनातनी विचारांच्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी महासंघाला समर्पक प्रयत्न करता येतील. नव्या नियुक्तीबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी गोपाळघरे यांनी अध्यक्षीय समारोपात तुरूकमारेंचे अभिनंदन करून ते मिळालेली जबाबदारीही पुर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होतील असा आशावाद व्यक्त केला.
आपल्या नियुक्तीप्रित्यर्थ केलेल्या सत्काराबद्दल आभार मानताना मिलिंद तुरूकमारे यांनी मी सर्वांना सोबत घेऊन कास्ट्राईब महासंघाला अधिक बळकट करण्यास वचनबद्ध असल्याही ग्वाही देऊन सर्वांचे मनापासून आभार मानले. 
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महासचिव सदाशिव भालेराव यांनी केले तर विजय डोंगरे यांनी आभार मानले. 
या बैठकीस माजलगाव जेष्ठ नेते केंद्रप्रमुख ए.टी.चव्हाण,केंद्रप्रमुख संजय मोरे,तालुकाध्यक्ष दयानंद खोपे, जेष्ठ मार्गदर्शक भगवान पौळ, एन.जी.शिनगारे, दिपक भालेराव,विजय डोंगरे,अमोल आतकरे,ग्रेड मुख्याध्यापक एस.वाय.सुतार,पी.बी.शिंदे,
सुनिल सुतार, सुनिल राठोड, प्रदीप गायकवाड, विजय मोरे,महेश वायभसे, विनोद शिरमेवार, उमेश ढेपे, विनोद हिवाळे, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,केंद्रीय मुख्याध्यापक आवर्जून उपस्थित होते.