भाजपा कडून माऊली वादे यांच्या नावाची चर्चा
--------------------------------------
शुभम घोडके/गेवराई
गेवराई (प्रतिनिधी) सध्या नगर परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये
अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण आरक्षण सोडत झाली असून यंदाच्या निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेला पुढे येत आहेत.
गेवराई शहरातील सावता नगर भागात रहिवासी असलेले माऊली वादे हे सामाजिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात धावून येण्याचे काम ते प्रामाणिकपणे करत आहेत निस्वार्थी निर्भीडपणे काम करण्याचा मानस त्यांचा असतो
गेल्या काही वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना नेत्यांकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे ते काम करत आहेत तसेच आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली अरुण मस्के, मधुकर वादे यांच्या मार्गदर्शनाखाली व सध्या ते भारतीय जनता पक्षाचे काम करत आहेत. निस्वार्थी निष्कलंक, प्रामाणिक, निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे माऊली वादे ला येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी संधी देणार का ?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे