तरुणांनो उद्योग व्यवसायाकडे या...
........................................
शुभम घोडके/गेवराई
---------------------------------------
गेवराई ( प्रतिनिधी) नोकरीच्या आशेवर राहण्यापेक्षा नव-तरुणांनी व्यवसाय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला हवं सध्याच्या स्थितीत नोकरी मिळवणं सर्वसामान्य लोकांना खूप कठीण आहे परंतु शिक्षणात खंड पडलेल्या तरुणांनी आता तरी व्यवसाय केला करावा म्हणून पुढे व्यवसायाला सुरुवात झाली पाहिजे व्यवसायातील झळाळी प्राप्त करण्यासाठी अफाट मेहनतीने सिध्द करून दाखविले पाहिजे व्यवसायाला सुरुवात करणारा तरुण हा खरी जिवणाची कला सफर करून दाखवेल व भविष्यात निश्चितच पाहायला मिळेल तरुणांनी व्यवसाय करणे अत्यंत गरजेचे बनले आहे सध्या तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगार होत आहे असे असताना देखील तरुणांना नोकर काम करण्यास जास्त रस असल्याचं दिसत आहे परंतु तरुण वर्ग कुठलीही ध्येय जिद्द न बाळगता आपण व्यवसायातील उद्योजक झालो पाहिजे अशी तमा त्यांनी मनाशी बाळगली पाहिजे असं ह्या निमित्ताने वाटते व्यवसाय करताना मालक होण्यासाठी तुमचा खरा कस लागतो. प्रचंड मेहनत लागते आणि आपण केलेल्या मेहनतीची दखल घेतली जात असेल तर त्यांचा निश्चितच आनंद होईल.
सध्याची बेरोजगारी पाहता तरुण वर्ग खूप भरकटला आहे यासाठी तरुणांनी व्यवसायिकाकडे आकर्षित असलं पाहिजे खरंतर व्यवसाय म्हटलं की ग्राहकांचा विश्वास असलेला संवाद आजही उत्कृष्ट ,उत्तम, सर्वश्रेष्ठ ,सर्वोत्तम, कामगिरी करणारा तरुण म्हणून ओळख निर्माण होत असते त्यामुळे तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळल्यास तरुणांची डिमांड वाढेल त्यांच्या उद्योग व्यवसायाला गती निर्माण होईल व्यवसाय केल्यास निश्चित प्राप्ती मिळेल सध्याच्या परिस्थितीत आता स्पर्धा वाढली आहे बऱ्याचंदा मोठे- मोठे लोक उद्योग क्षेत्राकडे वळतात काही वेळा उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे एक शिडी म्हणून बघितलं जातं. त्यांना खरं तर अनुभव आणि ग्राहकांत असलेला संवाद यामध्ये काम या माध्यमातून होतं असते. प्रामाणिकपणे व्यवसायकडे वळणारे नोकर आज फार कमी आहेत तरीही व्यवसाय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाशिवाय वळू नये.