आमदार लक्ष्मण(अण्णा) पवार यांना मंत्रिमंडळात संधी द्या -दीपक शेलार
---------------------------------------
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई च्या राजकारणात आदर्श आमदार म्हणून सर्व पराजित असलेले गेवराई तालुक्याचे लोकप्रिय आमदार लक्ष्मणराव पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत त्यांनी मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागात विकास कामाच्या माध्यमातून कामांचा धडाका केला आहे आणि केलेली विकास कामे ही अविस्मरणीय असून गेवराई तहसील कार्यालयात राशन वितरण व्यवस्था व बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यासाठी आमदार पवार यांना वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत निराधारांना न्याय मिळवून देण्यासाठी विधान भवनात सतत प्रयत्न केले आहेत पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाचा महासागर आणला आहे महाराष्ट्रातील एक आदर्श आमदार म्हणून अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून त्यामुळे त्यांच्यासारख्या चांगल्या व प्रामाणिक आमदाराला मंत्रिमंडळात संधी द्यावी अशी मागणी युवानेते दीपक शेलार यांनी केली आहे