बीड भावसार समाज तर्फे गुणवंत्त विद्यार्थ्यांचा सत्कार.
बीड (प्रतिनिधी) मे 2022 मध्ये बीड भावसार समाजातर्फे उन्हाळी अभ्यासक्रम घेण्यात आला होता या मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देवुन बीड भावसार समाजातर्फे सत्कार करण्या आला.कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर अप्पा म्हळदकर होते .भावसार पंच वाडा येथे झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर भावसार समाजाचे अध्यक्ष नंदुकुमार लांडे, धोंडीरामजी गरुड, वडवणी अध्यक्ष, महेश सदरे, अशोक लोखंडे ,विक्रम गार्डी, मनोज गार्डी होते.या वेळी झालेल्या कार्यक्रमास बीड भावसार समाजाचे सचिव चंद्रकांत धारुरकर सर, अशोक लोखंडे,दतात्रय लांडे गुरूजी, शहर महिला मंडळाच्या सौ. रंगदळ ताई, धारुरकर मॅडम,भावसार सर,सचिन डेंग, नारायणराव उपरे, कैलास रंगदळ, दत्तात्रय तळेकर, बालाजी रंगदळ समाज बांधव, पालक, महिला गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.चंद्रकांत धारूरकर यांनी केले.
बीड भावसार समाजातर्फे पहिली ते सातवी विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी अभ्यासक्रमात यशस्वी ठरलेल्या समृद्धी लक्ष्मण फटाले, गौरी राम फटाले ,समीक्षा मनोज गार्डी , सिद्धी नारायण उपरे,पार्थ नारायण उपरे, सुजल राम फटाले, आदिती शाम फटाले या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला .यावेळी सिद्धी नारायण उपरे ,पार्थ नारायण उपरे, तसेच गिरीराज अशोक लोखंडे या विद्यार्थ्यांचा विशेष गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला.