हिरापुर येथिल पुलावर अर्भक मृतावस्थेत सापडले
----------------------------------
शुभम घोडके/गेवराई
गेवराई (प्रतिनिधी) हिरापूर रोड येथील राष्ट्रीय महामार्गावर आज रविवार रोजी सकाळी 10 वाजल्याच्या दरम्यान चार ते पाच महिन्यांचे अर्भक (मुलीचे)मृतावस्थेत सापडले असून यामुळे खळबळ उडाली आहे.
गेवराई तालुक्यातील हिरापूर येथील राष्ट्रीय महामार्गवरील पुलावर रस्त्याच्या बाजूला लाल रंगाच्या बनेल च्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत चार ते पाच महिन्यांचे अर्भक (मुलीचे)मृतावस्थेत सापडले आहे सदर याची माहिती नागरिकांनी पोलिसाला दिली आहे सदर कुत्र्याने शरीराचे लचके तोडल्याचा अंदाज असून त्या अर्भक शरीरावर खोल जखमा झाल्या होत्या त्याने सर्वत्र खळबळ उडाली होती
अर्भक बीड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे