भेटी लागे जीवा..!!
विठ्ठल नामाचा गजर
--------------------------------
वारकऱ्यांना विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे खरंतर कोरोना सारख्या महाभयंकर महामारी पंढरपूरची वारी यात मोठा खंड पडला होता परंतु यावर्षी पुन्हा नव्या जोमाने पंढरपूरची यात्रा आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात साजरी होत आहे या भक्तीत तल्लीन होऊन महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण होय. आषाढी एकादशी निमित्त हा वारकऱ्यांचा महत्त्वाचा दिवस मानला जातो.पायी दिंडीत सहभागी होणा-यांना वारकरी म्हटले जाते. विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ, मृदुंगच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूर पर्यंत चालत नेतात. गळयात तुळशीच्या माळा घालतात व कपाळी गंध लावतात. एकादशीचे दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो. देवाला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. गावोगावच्या मंदिरात भजन-कीर्तने होतात.महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो आषाढी एकादशीला – म्हणजेच आषाढ शुध्द एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात. महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण होय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचलेला महत्त्वाचा सण आषाढी एकादशी होय.
या एकादशी निमित्त अनेक लोक पंढरपूरची वारी करतात, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात.
लेखक:- कु.आरती अनिल म्हेत्रे
( श्री. चिंतेश्वर विद्यालय , गेवराई)