होन परिवाराचे चांदेकसारे परिसरासाठी शैक्षणिक योगदान अमुल्य!
जेऊर कुभांरी ।।प्रतिनिधी ।।
कोपरगांव तालुक्यातील चांदेकसारे या गावात एका ध्येयवेड्या दुरदृष्टीकोन असलेल्या कुटुंबानी एक शैक्षणिक संस्था सुरू केली. या संस्थेचे नाव जिजाई बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था, गावातीलच नव्हे तर आजुबाजूच्या पाच ते सहा गावात ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे.
सविस्तर वृत्त असे की,
संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव नबाजी होन, सचिव श्री सुनिल भास्करराव होन यांच्या समाजासाठी काहीतरी करण्याचा ध्यास नजरे समोर ठेवून, तो वेळोवेळी सामाजिक कार्यातुन प्रकर्षाने जाणवतो. वरील शैक्षणिक
संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेची स्थापना २०१६ साली झालेली असली तरी इतक्या कमी कालावधीत ही संस्था नावारूपाला आली याचे श्रेय संस्थेवर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकाचे आहे.
चांदेकसारे व परिसर मुळात ग्रामीण भाग या भागात शेतकरी, कष्टकरी मोलमजुर जास्त प्रमाणात दिसते. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी दुरवर जावे लागत, नेमकी अडचण आेळखुन संस्थेने "जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल" ची स्थापना केली. जागतिक पातळीला आपल्या ग्रामीण भागातील मुलांनी सहभागी व्हायला हवे, पुढे स्पर्धेच्या युगात माझ्या शेतकरी बांधवांची मुलेही तितक्याच ताकदीने उभी रहायला हवी या एकाच उद्देशाने स्कूल स्थापन करण्यामागे प्रयत्न करण्यात आले. व्यवस्थापकीय संचालक श्री सागर भास्करराव होन यांच्या अचुक नियोजनात स्कूलच्या पहिल्याच वर्षी पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या संस्थेत येणारे विद्यार्थी मुळात ग्रामीण भागातील शेतकरी ,शेतमजूर कुटुंबातील येणारे आहे. त्यांना संस्कारक्षम बनवून शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने पुढे नेणे हेच जोगेश्वरी स्कूल चे मुख्य ध्येय आहे. या साठी स्कूल मध्ये विविध उपक्रम राबविले जातात, दिर्घ अनुभवी इग्रंजी भाषा पारंगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडविणारा समर्पित अध्यापक वर्ग कार्यरत आहे. प्राचार्या सौ पल्लवी दळवी यांच्या कडक शिस्तीत व अचुक नियोजनात स्कूल प्रगतीपथावर आहे.
डिजिटल क्लासरूम, वायफाय इंटरनेट सुविधा व स्कूल चा सर्व परिसर सी सी टि व्ही कॅमेरे बसविणारी एकमेव स्कूल जोगेश्वरी आहे. आपल्या स्कूलला महाराष्ट्र शासन इंग्रजी माध्यमाच्या नविन प्राथमिक ते माध्यमिक (इ.१ ली ते १० वी) इंग्रजी माध्यम, राज्यमंडळ शाळेस स्वयंअर्थसहाय्यीत तत्वावर सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षा पासून शाळेस मान्यता देण्यात आली.
संस्थेच्या वैभवात भर घालणारी गोष्ट म्हणजे स्कूलने सर्व पालकांची गरज आेळखुन स्वतः ची दिनदर्शिका सुरू केली. मागील वर्षा पासून ही दिनदर्शिका दिशादर्शक ठरत आहे. स्कूल मध्ये विविध उपक्रम राबविले जातात, राज्यसेवा, लोकसेवा उत्तीर्ण अधिकार्यांचे मार्गदर्शन मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून मिळत असते. या मुळे मुलांमध्ये स्पर्धा परिक्षेबद्दल आणि निर्माण होत आहे. स्कूल मध्ये प्रत्येक सण प्रामुख्याने आषाढी एकादशी, रमजान ईद, शिव जयंती, आंबेडकर जयंती या मोठ्या प्रमाणात साजरी केली जातात. या वेळी विद्यार्थी व शिक्षक वेगवेगळ्या पोषाखात येवुन कार्यक्रम करतात. यातुन सर्वधर्म समभाव जागृत होण्यास मदत होते. दहीहंडी, ख्रिसमस सुध्दा उत्साहात साजरे केले जातात. याच बरोबर गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, हस्ताक्षर स्पर्धा या विविध स्पर्धा अतंर्गत घेतल्या जातात.
आज डाऊच खुर्द या ठिकाणी स्कूल ची स्वतः ची भव्य इमारत आहे. व निसर्गाच्या सानिध्यात असल्याने कुठलही ध्वनी प्रदूषण किंवा गोंगाट होत नाही. अतिशय निसर्गरम्य वातावरणात मुले शिक्षणाचे धडे गिरवतात. यातुन मुलांना निसर्गावर प्रेम निर्माण व्हावे म्हणून त्या मुलांच्या वाढदिवशी एक झाड दत्तक दिलेले आहे. या संकल्पने मुळे स्कूल च्या परिसरात १०० पेक्षा जास्त झाडांची लागवड करण्यात आली आहे.
जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल ने सर्व विद्यार्थी जो पर्यंत स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे तो पर्यंत अपघाती विमा उतरविला आहे. या विम्याचे हप्ते संस्था स्वतः भरते. "जोगेश्वरी सुरक्षा कवच " या नावाने ही योजना न्यू इंडिया इन्शुरन्स या कपंनी च्या माध्यमातून सुरू आहे. विमा उतरविण्या मागे संस्थेचा एकच उद्देश आहे तो म्हणजे आपली मुले सुरक्षित राहावी व पालक निश्चिंत, आज संपुर्ण राज्यातील जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल ही विमा सुरक्षा देणारी एकमेव शाळा आहे.
या वर्षी कोरोना संसर्गामुळे शासनाने स्कूल बंद ठेवलेल्या आहे. तरी विदयार्थाचे नुकसान होणार नाही ही जबाबदारी जोगेश्वरीने घेतली आहे. सर्व शिक्षकवूंद घरी राहून आॅनलाईन लेक्चर घेत आहे. त्याच बरोबर युट्युब वर ही शाळेचा चॅनल असल्याने विद्यार्थी सहज अभ्यास पुर्ण करतात. घरी असुनही यामुळे शिक्षक व पालक एकमेकांशी जोडले गेलेले आहे.
शेतकरी, शेतमजूर व सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांसाठी एकमेव परिपुर्ण शैक्षणिक संकूल म्हणून पालकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले आहे.