वाढदिवशी यशराज पंडित यांनी खंडोबा मंदिर परिसरातील
शिवसेनेच्या 20 लक्ष रुपयांच्या कामाचा घेतला आढावा
गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेना युवानेते यशराज बदामराव पंडित यांचा वाढदिवसानिमित्त खंडोबा मंदिर श्री क्षेत्र पालख्या डोंगर येथे खंडेरायाची महाआरती करुन साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या वतीने खंडोबा मंदिर परिसरात करण्यात आलेल्या 20 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा आढावा युवानेते यशराज पंडित यांनी घेवून, कामाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी युवनेते यशराज पंडित यांनी परिसरात झालेल्या शिवसेनेचे नेते माजी खा. चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या विशेष प्रयत्नातून शिवसेनेचे राज्य सभा सदस्य खा राजकुमार धुत यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपयांचा सभामंडप, संरक्षण भिंत व बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती युध्दाजीत पंडित यांच्या प्रयत्नातून तिर्थक्षेत्र " क " मधुन 10 लक्ष रुपयांच्या पेव्हर ब्लॉक तसेच भाविकांच्या लोकसहभागातून केलेल्या वृक्ष लागवडीसह विविध विकास कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी किसान सेना तालुकाप्रमुख सतिश सपकाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, माजी उपसरपंच ञिंबक आण्णा गायकवाड, सुदाम येवले, गणेश काळे, गोवर्धन येवले, बाबु पौळ, युवा नेते अमोल जवरे, गणेश जगताप, विलास आडे, संतोष आडे, लक्ष्मण पौळ, अशोक देविदास येवले, नाशिक देवगुडेसह युवक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.