महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी ह .भ .प. एकनाथ महाराज पठाङे याची निवङ

राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या महाराष्ट्र राज्य  संपर्क प्रमुख पदी ह .भ .प. एकनाथ महाराज पठाङे याची निवङ 

गेवराई ।  प्रतिनिधी

राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी सुप्रसिद्ध  किर्तनकार ह भ प एकनाथ महाराज पठाङे याची निवङ करण्यात आल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे 

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील श्रीक्षेञ राक्षसभुवन येथील श्री शनिप्रसाद वारकरी शिक्षण संस्था संचलित शनिप्रसाद गोशाळेचे अध्यक्ष ह भ प एकनाथ महाराज पठाङे याच्या कार्याची दखल घेत  राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य
गेल्या अनेक वर्ष देव , देश , धर्म याबाबत कार्य चालु आहे यात विस्तार हेतुने श्री ह भ प गुरूवर्य भिष्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांच्या मार्गदर्शनाने व श्री ह भ प गुरूवर्य मारूती महाराज तुनतुने शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली , कार्याध्यक्ष श्री ह भ प बापु महाराज रावकर , समन्वयक श्री ह भ प अरूण महाराज पिंपळे , यांच्या सहमतीने श्रीक्षेत्र पंढरपुर येथे
महाराष्ट्र राज्याच्या संपर्क प्रमुख पदी श्री ह भ प एकनाथ महाराज पठाडे यांची निवड करण्यात आली आहे
याबद्दल सर्वांनीच अभिनंदन केले आहे  समाधान महाराज भोजेकर, तिर्थराज महाराज पठाडे, बाळासाहेब महाराज कुलकर्णी, निवृत्ती महाराज हल्लाळीकर ,तानजी महाराज चाकुरकर , आकाश महाराज खोकले, प्रदीप महाराज पाटिल , बबन महाराज पैठणे , वल्लभ महाराज गफाट ,  पंढरिनाथ महाराज मुरकुटे , वैजनाथ महाराज थोरात , भागवत महाराज सातभाये ,अभिषेक महाराज जाधव , उद्योजक अविनाश चौधरी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण  यांनी अभिनंदन केले आहे