गेवराई (प्रतिनिधी) गेवराई येथील अनेक वर्षापासून पत्रकरिता क्षेत्रात नव्या पर्वात कर्तव्यदक्ष कारभार असणारे वृत्तपत्र साप्ताहिक प्रकाश आधार वृत्तपत्राने आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रखरपणे मांडण्याचे धाडस निर्माण केले आहे त्यामुळे सा.प्रकाश आधार यशस्वी ठरतो म्हणून मनाचा ठाव घेणाऱया साप्ताहिक प्रकाशाच्या ऑनलाइन पोर्टलचा लोकार्पण 24 मार्च सोमवार रोजी सोहळा विविध संत- महंत मान्यवरांच्या साथीने आणि आपल्या मर्जीचे वृत्तपत्राच्या माध्यमातून पोर्टल शहरातून प्रसिद्ध होणार असल्याची माहिती संपादक सुनील पोपळे यांच्यासह टीमने दिली आहे.
शहरातील सिद्धेश्वर मंदिर संस्थान सावता नगर गेवराई येथे या ऑनलाइन पोर्टलचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी चिंतेश्वर संस्थांचे मठाधिपती महंत श्री. दिलीप बाबा घोगे हे पुढे बोलताना म्हटले की प्रत्येक लोकांना दिशा देण्याचे आणि त्यांचे प्रखर लेखणीचे क काम प्रकाश आधार समूह करीत आहे. हे वृत्तपत्र जनतेचे असल्याचे त्यांनी सांगितले, हे खरंच खूप चांगले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी या समूहाच्या मुख्य संपादकाला ओळखतो आहे. त्यांचे वृत्तपत्र खरोखरच निःपक्ष आहे. गेल्या काही वर्षात या समूहाने अंक काढले.त्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. पण् आज त्यांचे फळ गेवराईकरांना मिळतें आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित ह .भ. प. श्री सत्यनारायण महाराज लगड, विठ्ठल वादे, कर्तव्यदक्ष कोतवाल संदीपान राऊत , माऊली पंडित ,भागवत घोडके, लोकनियुक्त पत्रकार शुभम घोडके, युवराज कळसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.