आष्टी प्रतिनिधी
डोंगर किन्ही हल्ली मुक्काम धानोरा येथील सय्यद उस्मान अब्दुल्ला कुवेत वाले यांचे 06 डिसेंबर 2022 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.ते 85 वर्षाचे होते.धानोरा येथील जामा मस्जिद कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला.यावेळी अनेक स्नेही,चाहते,आप्तइष्ट,प्रतिष्ठित नागरिक,मुफ्ती,मौलाना मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुवेत वाले खालू म्हणून त्यांची ओळख होती.ते मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांच्या मागे पत्नी,मुलगा राज मोहम्मद,तीन मुली, सुन,नातवंडे असा परिवार आहे.कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचे ते मेहुणे होते