आष्टी प्रतिनिधी
शिववंशीय दशनाम गोसावी समाज बीड जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश गिरी यांची निवड झाली असून बीड जिल्हा अध्यक्षपदी महेश भारती यांची निवड झाली आहे.आष्टी तालुक्यातील बीडसांगवी या गावचे गणेश गिरी हे तळमळीचे समाजसेवक आहेत. कुणाच्याही संकट काळात ते धावून जातात.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असून सर्व समाजात प्रिय असून कुणाच्याही अडीअडचणी ते स्वतः दत्त म्हणून उभे राहतात.पुणे येथील बैठकीत निवड झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष सुदाम गोसावी,अध्यक्ष संदीप भारती, युवा अध्यक्ष सूर्यकांत गिरी गोसावी,कार्याध्यक्ष संतोष गिरी,प्रमुख महेंद्र गोसावी,पुणे कार्याध्यक्ष सोमनाथ गोसावी,प्रसिद्ध प्रमुख शहागिरी गिरी,बीड जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी भारती,नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, बीडसांगवीचे मुख्याध्यापक डोके साहेब,सर्व स्टाफ,सर्व कर्मचारी,बीडसांगवी येथील नागरिक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.