मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राजाभाऊ आतकरे यांना फराळाचे आमंत्रण
गेवराई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील उत्कृष्ट आशा एका शेतक-याला वर्षा बंगल्यावर फराळाचे आमंत्रण दिले होते. बीड जिल्ह्यात कृषी उद्यान पंडित राजाभाऊ आतकरे यांना तो मान मिळाला.
गेवराई तालुक्यातील कृषी उद्यान पंडित तथा देवकिनंदन शेतकरी माॅलचे मालक राजाभाऊ निवृत्तीराव आतकरे यांनी तालुक्यातील शेतकरी संघटीत केले आपण पिकवलेला माल स्वता:हच विकायचा व व्यापारी यांच्या पासुन होणारी लुट थांबवयाची तसेच शेतक-यांना शेती कशा पद्धतीने करायची व कोणते पिक कधी घ्यायचे याचे वेळोवेळी मार्गदर्शक केले त्यांच्या चांगल्या कामामुळे ते सर्वत्र परीचित असुन त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुंबई येथील शासकीय वर्षा बंगल्यावर दि. 25 आक्टोबर रोजी फराळ व स्नेह भोजनासाठी दिपावलीचे औचित्य साधून सपत्नीक राजाभाऊ आतकरे यांना आमंत्रण केले होते. बीड जिल्ह्यातुन ते एकमेव शेतकरी असुन जिल्ह्यात त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.