महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

तालखेड गावच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व:-शितल चौधरी

तालखेड गावच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व:-शितल चौधरी
-------------------------------------

समाजसेवे बरोबर सामाजिक  कार्यात नेहमीप्रमाणे अग्रेसर असणाऱ्या शितल चौधरी यांनी राजकारणात प्रवेश करताच विजयाची नांदी सरपंच पदाबरोबर खेचून आणली एवढेच नव्हे सामाजिक कार्य करत करत राजकारणात प्रवेश करून तालखेड गावाचा विकासासाठी आवश्यक ते कामे त्यांनी प्रामाणिकपणे केली आहेत विशेष म्हणजे त्यांनी तालखेड ग्रामपंचायत माध्यमातून वेळोवेळी विकास कामांना प्राधान्य दिले.

धडाकेबाज विकास कामाने शितलताईंची लोकप्रियता तालखेड गावात अधिकच वाढत असल्यामुळे विरोधी पक्ष घालमेल होत असुन विकासाची गुढी तालखेड गावात शितलताईंनी उभी केली असल्याने माजलगाव तालुक्यातील तालखेड सर्कल येथील रहिवासी असलेले मुकुंद चौधरी यांनी डावी चळवळ या सामाजिक क्षेत्रातुन जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून सामाजिक बांधिलकी जोपासत गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र मेहनत करून नवतरुण ताडेश्वर ग्रामविकास पॅनल वतिने त्यांच्या पत्नी सौ.शितल मुकुंद चौधरी यांनी 2018मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवली त्या निवडणूकीत त्यांचा दणदणीत विजय झाला माजलगाव तालुक्यातील तालखेड हे गावची लोकसंख्या10,000 जवळपास आहे तालखेड येथे ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम हाती घेऊन तरुण महिला मंडळी एकत्र येऊन सरपंचासह गाव स्वच्छ करण्यासाठी वसा घेतला होता  ही मोहीम जवळपास सहा महिने चालविली संपूर्ण गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी यशस्वीपणे ही मोहीम राबवण्यात काम ग्रामस्थांनी केलं  तसेच मुकुंद चौधरी यांनी अंध अपंग वयोवृद्ध यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे काम केलं समाजसेवा करत असतांनी   जनतेची नाळ त्यांनी कधीही तोटु दिली नाही ते जनतेच्या प्रश्नावर सतत आक्रमक असतात समाजकारण करत त्यांनी राजकारणात प्रवेश केला कुठलाही राजकीय वारसा नसताना नवतरुण ताडेश्वर ग्रामविकास पॅनलच्या वतिने त्यांच्या पत्नी सौ. शितल मुकुंद चौधरी यांनी जनतेतून सरपंच पदाची निवडणूक लढवली त्यानंतर त्यांनी दणदणीत विजय मिळवला आणि आपल्या तालखेड गावाचा विकासासाठी धडाका लावला तालखेड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिलांचा महत्त्वाचा सण म्हणजे संक्राती असते त्या माध्यमातून महिलांना वृक्ष लागवडीसाठी वृक्ष वाटप उपक्रम राबवून एक आगळा वेगळा कार्यक्रम त्यांनी घेतला होता तसेच घन वृक्ष लागवड योजनाच्या माध्यमातून तालखेड येथे 800झाडांची लागवड केली तालखेड गावात मूलभूत सुविधांचा प्रश्न कोणताही असो ते तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत तसेच पाणी लाईट, सिमेंट रस्ते ,हातपंप, स्मशानभूमी, सौर ऊर्जा, प्ले वर  ब्लॉक, नाल्या अशा विविध विकासकामे केली आहे मुकुंद चौधरी यांची तरुण युवकात मोठी क्रेझ आहे त्यांचं कार्य अप्रतिम चांगल्या प्रकारे असल्यामुळे तालखेड गावातील सर्वसामान्य जनता त्यांच्या कामगिरीवर खुश असल्याचं दिसून येतं आहे सर्वसामान्य माणसाला आपला हक्क मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात जनतेच्या मनातील सुपरहिरो असं म्हटलं तरी वावगं ठरणार अशा आदर्श सरपंच सौ. शितल मुकुंद चौधरी यांना पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा..!!

लेखक शुभम घोडके (उपसंपादक‌ प्रकाश आधार)