आष्टी वार्ताहर दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांचा यंदाचा दिवाळी अंक वाचकांच्या सेवेत रुजू झाला आहे.तीसीकडे झेपावणाऱ्या या दिवाळी अंकात गुरुवर्य ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे,डॉ.सतीश साळुंके,
प्रफुल्ल सहस्रबुद्धे,दिनकर महाराज तांदळे, प्रा.मोहन काळकुटे,सौ.आशा अजित वरपे,प्रा.सय्यद अलाऊद्दीन प्रा.महेश चवरे ,शिवराम होके,
प्रा.राहुल निकाळजे,प्रवीण पोकळे,जी.आर.बोराटे, डॉ.सय्यद हुमायुद्दीन,दत्ताभाऊ बोडखे,आकाश डोंगरे, उत्तम बोडखे यांचे विविध विषयावरील लेख आहेत.
ग्रामीण कथाकार विठ्ठल जाधव, सौ.भारती सावंत यांच्या दिलखेचक कथा, सोपान हळमकर,इंद्रजीत घुले,अमृता नरसाळे,अनिल होळकर,अर्चना स्वामी,सुरेश तळेकर,दिपाली डोके- साके,
दत्ता पेंदोर,मनिषा पाटील यांच्या बहारदार कविता आणि कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या उपहासिकांना प्रसिद्ध व्यंगचित्रकार भरत घटे यांची साजेशी व्यंगचित्रे असा हा साहित्यिक प्रपंच आहे.
अभिनेत्री प्रतीक्षा जाधव आणि महाराष्ट्राची स्टार अभिनेत्री लावणीसम्राज्ञी मानसी नाईक यांची कव्हर स्टोरी वाचावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे मानसी नाईकचे मुखपृष्ठ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.