गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील गढी येथे निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ङाॅ बलराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मृत्युंजय गणेश मंडळाच्या वतीने कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन गढी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव दहिफळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले या शिबिराचे आयोजन मृत्युंजय गणेश मंडळाचे मार्गदर्शक डॉक्टर चंद्रशेखर गवळी यांनी
आज पर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन या मंडळातर्फे करण्यात आल्याचे यावेळी सांगितले यामध्ये वृक्ष लागवड वृक्ष वाटप मंडळाच्या सदस्यांना टी-शर्ट चे वाटप असे विविध उपक्रम या मंडळातर्फे राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी मृत्युंजय गणेश मंडळाचे अध्यक्ष सुरेश वारे यांनी सांगितले की आम्ही गणेश विसर्जन करताना प्रदूषण मुक्त विसर्जन करू असे यावेळी सुरेश वारे यांनी सांगितले या कोरोना लसीकरण शिबिरामध्ये जवळपास दोनशे नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरण शिबिरामध्ये गढी प्राथमिक आरोग्य उप केंद्रातील एमपी ङब्लू सुरेश राठोड आरोग्य सेविका अश्विनी कळसे ज्योती दिवाण आशा स्वयंसेविका अरुणा तुपारी यांनी या लसीकरण शिबिरामध्ये सहभाग घेतला होता