कार्यकारी अभियंतापदी रविंद्र तोंडे
बीड ःप्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (क्र.1) कार्यकारी अभियंतापदी रविंद्र पांडुरंग तोंडे यांची नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी त्यांनी पदभार स्विकारला. रविंद्र तोंडे हे चर्हाठा येथील मुळ रहिवासी आहेत.
बीड येथील कार्यकारी अभियंत्याचे पद रिक्त गत काही काळापासून रिक्त होते. त्यांच्या जागी पदोन्नतीने रविंद्र तोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविंद्र तोंडे हे गेली सात वर्ष औरंगाबाद येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. तोंडे यांनी शुक्रवार दि.16 रोजी कार्यभार स्विकारला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सेवानिवृत् कार्यकारी अभियंता पांडुरंग तोंडे यांचे ते सुपुत्र आहेत.