परभणी,(प्रतिनिधी) ः सेलू येथील अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेतर्फे गुरुवारी (दि.08) सर्व सलून दुकाने व इतर व्यवसाय बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा शाखेच्या पदाधिकारी यांनी गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले; त्याद्वारे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. सेलू येथील नाभिक समाजाच्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बळजबरीने उचलून नेवून बोरी परिसरात अत्याचार केले. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणात संबंधित नराधमांवर पोलिस प्रशासनाद्वारे कठोर कारवाई व्हावी,आरोपी विरुद्ध पोक्सो कायदा लागू करावा; जलद गतीच्या न्यायालयात पोलीस प्रशासनाने खटला उभा करावा,या खटल्या करिता अँड.उज्वल निकम यांची राज्य सरकारने नियुक्ती करावी,भविष्यात असे प्रकार घडू नयेत, या दृष्टिकोनातून महिलांना सर्वतोपरी संरक्षण पुरवावे अशीही मागणी या संतप्त मंडळींनी केली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष भगवानराव वाघमारे, प्रदेश सरचिटणीस पांडुरंग भंवर,जिल्हाध्यक्ष संपत सवणे,सचिव साम साखरे, युवक जिल्हाध्यक्ष गोविंद भालेराव, तालुकाध्यक्ष वसंत पारवे, युवक शहराध्यक्ष बालाजी कंठाळे, बाळू काळे ,किसन भंवर,भगवत मस्के ,प्रदीप कचरे, गोकुळ मस्के, रतन काळे, नारायण मस्के, वैभव मस्के, शुभम राऊत, मुकुंद कुकुडे, गोविंद राऊत, प्रशांत समेट्टा, राजाभाऊ सनई,नवनाथ राऊत,नागोराव ढोबळे, राजेश भाऊवर,कृष्णा कंठाळे ,संतोष जाधव, आत्माराम प्रधान ,दगडू राऊत ,आत्माराम राऊत, प्रकाश कंठाळे ,अंकुश पितांबरे ,शुभ्रम समेटा, संतोष वाघमारे ,दत्ता गुंगे, विष्णू सूर्यवंशी, संतोष कंठाळे, रवी खंदारे ,संजय खिल्लारे, योगेश ठाकरगे ,विनोद क्षीरसागर ,दिगंबर कंठाळे, नागोराव प्रधान,मंचक भंवर आदी या मोर्चात सहभागी होते