कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी
श्री आत्माराम वाव्हळ यांची निवड
बीड प्रतिनिधी
कायम विनाअनुदानित शाळा कृती
समितीच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी श्री आत्माराम वाव्हळ यांची निवड करण्यात आल्याचे कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे सर यांनी मुंबईतील आझाद मैदानावर जाहीर केले. या वेळी त्यांच्या समवेत संघटनेचे राज्य कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आज शुक्रवार दि. 2 सप्टेंबर रोजी सदर निवडीचे निवड पत्र जिल्हा मुख्याध्यापक संघाचे बीड जिल्हाध्यक्ष श्री पैठणे सर, श्री. रसाळ सर, कृती समितीचे विभागीय अध्यक्ष श्री. जितेंद्र डोंगरे सर यांच्या सह इतर पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
मागील बारा तेरा वर्षांपासून कोणत्या ही पदाची अपेक्षा न करता संघटनेमध्ये सक्रिय राहुन काम करणारे तथा आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक आणि आदर्श पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दै. झुंजार नेताचे उपसंपादक तथा श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे श्री. आत्माराम वाव्हळ सर यांनी आतापर्यंत संघटनेमध्ये सक्रिय राहुन केलेल्या कामाची दखल घेत कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री. खंडेराव जगदाळे सर यांनी त्यांची बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. सदर निवड श्री. जगदाळे सरांनी मुंबईतील आझाद मैदानावर जाहीर केली. या वेळी त्यांच्या समवेत कृती समितीचे राज्य कार्यकारिणी विभागीय कार्यकारिणीतील मुख्य पदाधिकारी यांच्या सह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान सदर निवडीचे निवड पत्र काल शुक्रवार दि. २ रोजी बीड जिल्हा
मुख्याध्यापक संघाचे बीड जिल्हाध्यक्ष श्री पैठणे सर, श्री रसाळ सर, संघटनेचे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष श्री जितेंद्र डोंगरे सर, श्री.भागवत यादव सर, श्री. अभिषेक राऊत सर, श्री. बाळासाहेब नागरगोजे सर, श्री.विकास येडे सर, श्री. प्रदीप गाडे सर, श्री. लक्ष्मण इंगोले सर, श्री. पवार सर, श्री. सूर्यकांत धुरवडे सर, श्री विलास येडे सर, श्री सय्यद सर, श्री कदम (मामा) सर, श्री पंकज कळसकर यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी सर्व मान्यवरांसह श्री. लक्ष्मण जगताप सर, वैजनाथ चाटे सर, प्रताप पवार सर, अरविंद सौंदलकर, मुक्ता मोटे मॅडम, रविन्द्र बुकन सर
जावेद पठाण सर, बजरंग जाधव सर, सुरेखा गायकवाड मॅडम,
दिपक गरुड सर , विश्वनाथ मुंडे सर, गोविंद आघाव सर, क्षीरसागर सर, डी. जी. मुंडे सर, चंद्रशेखर तौर सर, अवचट सर, शेंडगे सर, अशोक मोरे सर, रामदास जामकर सर, देविदास चव्हाण सर, रमेश पाटोळे सर यांनी खास फोनद्वारे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. श्री.आत्माराम वाव्हळ सर यांची बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड जाहीर होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
___________________________