महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

पेरूच्या पानावर विठुरायाची प्रतिमा साकारणारी " साक्षी वावरे"

पेरूच्या पानावर विठुरायाची प्रतिमा साकारणारी  
" साक्षी वावरे"
----------------------------------------
शुभम घोडके/गेवराई


गेवराई (प्रतिनिधी)जीवनामध्ये प्रत्येक जण आपल्या आवडीचा छंद लहान पणा पासुन जोपासत असतो त्यामध्ये चित्रकला असो किंवा रांगोळी स्पर्धा ही एक वेगळीच कला आहे तसेच गेवराई शहरातील कु. साक्षी सचिन वावरे हिने आषाढी एकादशी निमित्त पेरूच्या पानावर विठ्ठलाची प्रतिमा  साकारली आहे  अशा विविध प्रकारे रांगोळी काढून अनेक हुबेहूब चित्रे तिने रेखाटली आहेत
कोणत्याही गोष्टीसाठी कला ही अवगत असावी. चित्रकला या कलेच्या माध्यमातून साक्षी वावरे हिला लहानपणापासूनच चित्र, रांगोळी काढण्याची आवड निर्माण झालेली आहे रेखाटण्याची कला अवगत असल्यामुळे तिच्या या कलेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तिने काढलेले चित्र, रांगोळी पाहून अनेकांच्या तिला कौतुकाची थाप मिळत आहे. असे अनेक प्रकारचे सुंदर रांगोळी तसेच हुबेहूब स्केच काढल्याने तिला त्यामध्ये सतत नेहमी चित्रकला व रांगोळी यांत अधिकच आवड झाली आहे.


तसेच पेरूच्या पानावर विट्टलाची प्रतिमा साकारली.असता "देव विट्ठल देव पूजा विट्ठल .. पर्ण पांडुरंग .. स्वर्ण पांडुरंग .." असे शीर्षक देऊन चित्र प्रदर्शित केले. तसेच मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी वारी या विषयाला अनुसरून सुदंर रांगोळी रेखाटन सुध्दा केले आहे. त्यामध्ये "तिने सुदंर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी मस्तक ठेवूनिया" असे शीर्षक देऊन आपल्या रांगोळी मध्ये तबला आणि वीणा वाजवताना वारकरी, गळ्यात तुळसीमाळा घालून उभा असलेला विठ्ठल आणि तान्ह्या बाळाला घेऊन आजी विठ्ठल दर्शनासाठी असे सुंदर आणि मनमोहक चित्र साकारले. साक्षी वावरे हिचे शालेय शिक्षण शारदा विद्या मंदीर पुर्ण झाले असून उच्च शिक्षण मराठवाडा प्रसारक मंडळाच्या र.भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथील एम. एस्सी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. कु. साक्षी वावरे हिने शिवजयंती निमित्त काढलेल्या तालुका स्तरीय भव्य रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक घेतला होता. तसेच केंद्रीय युवा महोत्सवात सहभाग नोंदवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात रांगोळी रेखाटली होती. मैत्री दिनाच्या निमित्तानेही पाण्यातली रांगोळी काढली होती. हिला २०२० मध्ये महाविद्यालयाचा मानाचा गौराई पुरस्कार देखील मिळाला आहे. ही अतिशय कला उपासक, होतकरू आणि विविध स्पर्धेत क्रमांक घेणारी कु. साक्षी हिचे कौतुक आहे. याबद्दल वडील  श्री. सचिन वावरे आई सौ.कविता वावरे आणि भाऊ शुभम वावरे यांचे वेळोवेळी प्रोत्साहन आणि महाविद्यालया च्या सरांचे मार्गदर्शन लाभले असुन तिने हुबेहूब चित्र व  रांगोळी रेखाटल्यांने तिच्या कलेला पाहून अनेक जण आश्चर्यचकित होत आहेत तिच्या या उल्लेखनीय कार्यामुळे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.