प्रवेशाच्यावेळी विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या शाळा/विद्यालय/ महाविद्यालयांविरुद्ध कारवाई व्हावी - मनविसे
विद्यार्थ्यांच्या दाखल्याकरीता दिरंगाई करणाऱ्या,अधिक फी घेणाऱ्या सेतु चालकांवर देखील कारवाई करण्यात यावी- बाबा शिंदे
श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :
शाळा/ विद्यालय/ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी व्यवस्थापनाकडून होणाऱ्या आडवणूकीबाबत अशा शाळा/ विद्यालय/ महाविद्यालय व्यलस्थापनाविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी असे मनसे विद्यार्थी सेना च्या वतीने श्रीरामपूर येथील गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की,सध्या शाळा /विद्यालय/ महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया चालू असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विविध स्वरुपांचे आवश्यक कागदपत्रे (दाखले) काढण्यासाठी सेतू कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी विद्यार्थ्यांची अडवणूक होत आहे. वेळेत कागदपत्रे मिळत नाही, मग त्यात वार्षिक उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर दाखला, जात पडताळणीचा दाखला अशा विविध कागदपत्रांसाठी या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचे अनेक विद्यार्थी आमच्याकडे तक्रार करत आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी संबंधित व्यवस्थापन डोनेशनची मागणी करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे जास्त ते फी भरु शकत नाही. नियम बाह्य फी मिळत असल्याने शाळा व महाविद्यालयातील व्यवस्थापक हे श्रीमंत मुलांना ऍडमिशनला, प्रथम प्राधान्य देत आहेत.यामुळे अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व महाविद्यालय व्यवस्थापकांवर कठोर कारवाई करण्याची यावी कारण अत्ताच कारोना १९ ची त्रिवता कमी असून काही शाळा व महाविद्यालय व्यलस्थापने मनमानी फी व डोनेशनची आकारणी करण्याची सुरुवात केलेले आहे. त्यामुळे पालक वर्ग हवालदिल झालेले आहे. काहींना नोकरी नाही, व्यवसाय नाही त्यातच फी व डोनेशनची मागणी वाढत आहे. तसेच जे सेतु कार्यालय, शासकीय फी पेक्षा जास्त अतिरिक्त पैसे घेत आहेत त्या सेतू कार्यालयावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी व आमच्या निवेदनाची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या आपण सर्व महाविद्यालय, तहसील, तलाठी, सेतु कार्यालयाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना त्वरीत न्याय मिळवून देण्यात यावे. येत्या २-४ दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल. मग होणाऱ्या परिणामास आपण स्वत: जबाबदार रहाल असेही निवेदनात शेवटी नमुद करण्यात आले आहे,या निवेदनावर मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष मनविसे गणेश दिवसे,तालुकाध्यक्ष मनविसे गणेश रोकडे, शहराध्यक्ष मनविसे
विशाल लोंढे आदींच्या स्वाक्षऱ्या असुन याप्रसंगी जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप, उपजिल्हाध्यक्ष संतोष डहाळे, तालुकाध्यक्ष प्रविण आबा) रोकडे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, कामगार सेना तालुका अध्यक्ष सचिन पाळंदे, निलेश सोनवणे, संदीप विशमबर, अमोल साबणे, अक्षय सूर्यवंशी, विकी परदेसी, मंगेश जाधव, संकेत शेलार, रोहन गायकवाड, श्रीराम थोरात, जगन सुपेकर, अमोल ढाकणे, सागर भोंडगे, अक्षय अभंग, राहुल शिंदे, श्याम लांडे, प्रमोद शिंदे, किशोर बनसोडे, आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.