आरोपीस कठोर शिक्षा करा अशोक गायकवाड
गेवराई प्रतिनिधी
पाटण जिल्हा सातारा येथील सुतार समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी गेवराई तालुका विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केली आहे
सदर माहिती अशी की विश्वकर्मा वंशीय समाज संघटन गेवराई जि बीड जिल्हाच्या वतिने सातारा जिल्हा पाटण तालुक्यातील रुवले गावांमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना... आपल्या विश्वकर्मा सुतार समाजातील ७ वर्षाच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करुन अमानुषपणे हत्या करण्यात आली.या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी व अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधमास कठोर योग्य ती कलमे लावुन,खटला जलदगती न्यायालयात दाखल होऊन,योग्य त्या सरकारी वकीलांची नेमणूक व्हावी,वआरोपीस कठोर शिक्षा व्हावी व अशा निंदनीय घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपआपल्या फोर व्हिलर गाडीवर जाहिर निषेधाचे बॕनर लावुन व सर्वानी काळ्या फिती बांधुन पोलीस निरीक्षक गेवराई यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळीस विश्वकर्मा वंशीय समाज संघटन गेवराई तालुका अध्यक्ष अशोक गायकवाड उपाध्यक्ष बाबासाहेब सांगोळे विश्वकर्मा प्रतिष्ठान चे अध्यक्ष बबनराव सोनवणे शिवाजी झेंडेकर सर किशोर वाघमारे महेश ननवरे सुनील सांगळे अनिल गायकवाड अमोल सांगळे सचिन गायकवाड सचिन सांगळे लहू सोनवणे ववंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड सुनील पोपळे नाभिक मंडळ संघटना, किशोर भोले बाबासाहेब सावंत रमेश सावंत बाप्पा गायकवाड राजेश गायकवाड बाळू गायकवाड सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व ओ बी सी तसेच वचिंत बहूजन आघाडी चे पदाधिकारी व गेवराई तालुका विश्वकर्मा वंशीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
