महिलांचा तिळगुळ महोत्सव...!
( साप्ताहिक प्रकाश आधार अग्रलेख)
संक्रांत दिनाचे औचित्य साधून
माँ संतोषी अर्बन बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू , तिळगुळ महोत्सव आनंदात, उत्साहात साजरा झाला.खर म्हणजे, कुंकवाला अहेवाचं लेन, अस संबोधन आहे. भारतीय संस्कृतीत कुंकवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. आज कुंकवाच्या जागी टिकली आहे. हा भाग असला तरी, कुंकवाचे महत्त्व कमी झालेले नाही. म्हणूनच, कुंकुवाच्या दोन बोटाला आणि चहाच्या घोटाला नाही म्हणता येत नाही. घरी पाहुण्यांची आवक जावक झाली की, महिला एकमेकींना कुंकू - हळद लावल्या शिवाय जावू देत नाहीत. त्या निमित्ताने एकमेकींच्या जीवाच्या धन्याला "आवूक" मागण्याची संधी मिळते. संक्रमण होणारा हा काळ आहे. विचाराचे संक्रमण व्हावे, एका बियाची रूजवात होऊन त्याला नवांकूर फुटावेत, ही अपेक्षा आहे.
महिलांचे जग खूप समाधानी असते. त्या चिवट असतात. चिकाटी असते. त्या बोलताना म्हणत असतात,
काळा मनी अन जीवचा धनी. पदर खोचून घर उभे करीन, पण माझ्या धन्याला काही कमी पडू देऊ नको.
मां संतोषी अर्बन बँकेचे चेअरमन संतोष भालशंकर यांच्या आईच्या उपस्थित हा महोत्सव पार पडला. सौ. गीताभाभी बाळराजे पवार, महासाहेब, पुजा मोरे यांनी आपली मते मांडली.गीता भाभींनी भावनिक साद घालून, स्वतःची मते मांडली. त्या व्यक्त झाल्या. या निमित्ताने त्यांनी जोडीदारी आयुष्यातली साथ किती महत्वाची असते. "तो" आपल्या आणि एकुणच कुटुंबासाठी किती महत्वाचा असतो. हे अधोरेखीत करता करता, त्यांचा कंठ दाटून आला.
कुलगुरू शिवाजीराव भोसले यांनी
पत्नी नावाचे कार्यालय आणि अहोरात्र झटणारा बाप, एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि रथाची दोन चाके असल्याचे प्रतिपादन केले आहे.संजय भालशंकर सारखा आईच्या काळजाचा आणि आईची महती गाणारा भला माणूस आहे. अशी माणसे ताई , माईच्या, बाई आणि आईच्या हिताचा विचार करतो. त्यांना व्यासपीठावर आणतो. हा विचारच पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीला सुगंध देणारा आहे.पुजाताईनी महिलांच्या वैयक्तिक विषयावर परखड मते मांडली. हल्ली महिलांचे आजार महत्त्वाचा विषय आहे. महिलांमध्ये कॅन्सर चे प्रमाण त्या मानाने अधिक आहे ते का वाढते आहे. असा सर्वसमावेशक विषय मांडून त्यांनी महिलांचे लक्ष वेधले. मासिक पाळी मध्ये काय काळजी घ्यायला हवी. ती का घेतली जात नाही. पॅड कोणते वापरायला हवेत. कपडा शुद्ध असायला हवा. तो कुठे आणि कसा मिळतो. या विषयी प्रबोधन केले. खर म्हणजे, महिला स्वतःच्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. घर सांभाळताना तिचे परवड होते. वेळ मिळत नाही किंवा दुखणे अंगावर काढतात, हा कळीचा मुद्दा आहे. नवरा म्हणून, त्यांच ही दुर्लक्ष होतच. कारण, ती बिचारी दुखण्याची वाच्यता करत बसत नाही. काम काम आणि काम, या शिवाय तिला काही सुचत नाही.असो, आम्हाला वाटते महिलांना व्यासपीठ मिळवून देणे चांगली गोष्ट आहे. त्या निमित्ताने चांगले विषय चर्चेत येतात. काही महत्त्वाच्या विषयावर मंथन होते. एकमेकांशी संवाद साधून
प्रबोधन करता येते. हितगुज महत्त्वाचे आहे. अल्वीन टाॅपलर म्हणतो,
दुहरी संवादातून अनेक प्रश्न निर्माण होतात आणि सुटतात.
मां संतोषी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने ही जबाबदारी पार पाडली आहे. त्यांचे कौतुक आहे.
