गेवराईत चोरट्यांचा डल्ला मारायचा डाव फसला
-------------------------------------
गेवराई शहरात चोरीचे प्रमाण वाढले
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शहरात सध्या मकर संक्रांती निमित्त महिला बाजारपेठेत खरेदीसाठी येत असुन गर्दी होत असल्याचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली आहे.
अन्यात चोरट्याने एका महिलेचे सोन्याचे गंठण चोरण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न चोरट्याचा फसला मकर संक्रांतीच्या धामधुमीत होत असलेल्या चोरीमुळे चोरट्यांची दहशत वाढली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण फारच कमी असल्याने नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली कि काय असा प्रश्न पडला आहे तसेच पोलिस प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
