पॉवरफुल बंजारा नेता किसनभाऊ राठोड यांचा करिश्मा-मंत्रिमंडळात मिळणार संधी ?
----------------------------------------
बीड प्रतिनिधी
भारत देशाच्या नकाशावर गोर बंजारा समाजाचे नाव कोरण्यासाठी गोर धर्म व गोरबोलीला केंद्र सरकारची अधिकृत मान्यता मिळविण्यासाठी समाजाची चळवळ गतिमान करणारे,संयमी अभ्यासू व धाडसी नेते किसनभाऊ राठोड हे भारतातील सव्वीस राज्यात वास्तव्यास असलेल्या समस्त बंजारा समाज बांधवांना श्रद्धेने माथा टेकवण्यासाठी पवित्र काशी पोहरादेवी येथे भक्तीधाम, बंजारा धर्मपीठ व राज्यातील वेगवेगळ्या भागात बंजारा तीर्थक्षेत्राचे निर्माण केले आहे. धर्मसत्तेला बळ देणारे नेते म्हणून किसनभाऊ प्रसिद्ध आहेत. बंजारा समाजासाठी सामाजिक शैक्षणिक अर्थिक सांस्कृतिक धार्मिक व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्यागी व समर्पित नेते म्हणून किसनभाऊ राठोड यांचा उल्लेख आदरपूर्वक केला जातो.हाजारो आक्रमक व जाबांज कार्यकर्त्यांचा समावेश असलेली देशपातळीवरील शक्तीशाली सामाजिक संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किसनभाऊ राठोड यांना एका सत्ताधारी पक्षाकडून मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली जाणार आहे ? अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे..
किसनभाऊ राठोड यांनी बंजारा समाजाची धर्मसत्ता मजबूत करून गोर बंजारा समाजाला राजसत्तेकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. म्हणून देशातील बंजारा समाज मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत जोडला गेला आहे.देशपातळीवरील बंजारा समाजातील सर्वात विश्वसनीय,निस्वार्थी त्यागी व धाडसी नेतृत्व म्हणून किसनभाऊची समाजामध्ये ओळख निर्माण झाली आहे.
नुकताच किसनभाऊ राठोड यांनी बंजारा जोडो अभियान अंतर्गत मराठवाड्याचा दौरा केला.या दरम्यान बंजारा समाजाला *चलो गोर राजसत्ता की ओर* हा नारा दिला.दौऱ्या दरम्यान किसन भाऊंना प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेकडो गाड्यांचा ताफा, जागो-जागी लोकांनी उत्स्फूर्तपणे केलेले त्यांचे जंगी स्वागत,बीड जिल्ह्यात क्रेनच्या सहाय्याने मोठे तोरण हाराणे झालेले स्वागत ऐतिहासिक होते.
तांड्यातील आया-बहिणींनी रस्त्यावर येऊन आरती ओवाळून केलेली औक्षण,अनेक ठिकाणी गाड्यांचा ताफा अडवण्यासाठी रस्त्यावर झोपलेले कार्यकर्ते, आमचा देव आला म्हणून घोषणा देणारे कार्यकर्ते,त्यामुळे बंजारा समाजामध्ये नवचैतन्य संचारले आहे.
बंजारा समाजाचे हित साधण्यासाठी सेवालाल महाराजांचा पुन्हा अवतार झाला की काय ? ही भावना प्रत्येक तांडा-तांड्यातील माणसांकडून व्यक्त होत होती.
समाजाची धर्मसत्ता,साहित्य सत्ता,सांस्कृतिक व धार्मिक सत्ता मजबूत करणारा शक्तीशाली नेता आहे.तसेच सध्या राजसत्तेचा नारा देऊन समाजातील राजकीय लोकांना ताकद देण्यासाठी किसनभाऊंनी संकल्प केला आहे.
किसनभाऊंच्या मराठवाडा दौऱ्यामुळे बंजारा समाजातील राजकीय कार्यकर्ते,नेत्यांची ताकद अनेक पटींनी वाढली आहे. राज्यभरात किसन भाऊंच्या नेतृत्वाचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
किसनभाऊंना मिळणारा प्रचंड प्रतिसाद उल्लेखनिय होता. त्यांच्या सभेला हजारो लोकांची उपस्थिती प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या छातीत धडकी भरवणारी होती.किसनभाऊ राठोड यांना बघण्या करिता, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत तुफान गर्दी जमायची.किसनभाऊंचे भाषण ऐकून समाज बांधव लोकं मंत्रमुग्ध होऊन जायचे.
नजीकच्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,विधानसभा लोकसभेच्या निवडणुकी साठी इच्छुक असलेल्या बंजारा समाजातील अनेक नेत्यांच्या पाठीमागे बंजारा जोडो अभियान मुळे मोठी निर्णायक ताकद उभी राहणार आहे.किसनभाऊनी आमच्या मतदारसंघात बंजारा जोडो अभियान राबवावे,दौरा करावा या करिता अनेक नेत्यांनी इच्छुक उमेदवारांनी साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.
बंजारा समाजा बरोबरच बहुजन,भटके विमुक्त,बारा बलुतेदार यांना विश्वासात घेऊन बहुजनांची मजबूत वज्रमूठ बांधण्याचे काम राष्ट्रीय बंजारा परिषद कडून सुरू करण्यात आले आहे. एकच पर्व-बंजारा, ओबीसी सर्व हि नवीन संकल्पना समाजात रुजवणे सुरू आहे.
एका सर्वेक्षना नुसार देशातील बंजारा समाजाकडून सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक अर्थिक व राजकीय चळवळ गतिमान करणारा एकमेव नेता म्हणून किसनभाऊ राठोड यांना पहिली पसंती देण्यात आली आहे.किसनभाऊ राठोड यांच्या धाडसी नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील चाळीस ते पन्नास विधानसभा मतदार संघामध्ये राजकीय गणिते बदलू शकतात.किसन भाऊ राठोड ज्या पक्षाबरोबर युती किंवा आघाडी करतील, त्यांच्या पुढाकाराने मराठवाडा, विदर्भ व खानदेश विभागातून बंजारा समाजाचे दहा ते पंधरा आमदार निश्चित निवडून येवू शकतात,हि काळया दगडावरची पांढरी रेष आहे.
किसनभाऊ रूपी झंझावाती वादळाने सर्व राजकीय पक्ष प्रमुखांचे लक्ष वेधून घेतले आहे. किसनभाऊ सारखा मासलिडर आपल्या सोबत असावा असे सर्व पक्षाला मनोमन वाटते.
एका राष्ट्रीय पक्षांकडून किसन भाऊंना पक्ष प्रवेशा सह महामंडळाची ऑफर होती,ती नाकारल्याने डायरेक्ट मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर देण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे ?.
किसनभाऊ राठोड यांनी राबविलेल्या बंजारा जोडो अभियानामुळे विदर्भ व मराठवाड्यातील राजकीय वातावरण तापले आहे. किसनभाऊ आपल्या पक्षात हवेत यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे समजते.एका राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ टीमने किसनभाऊ राठोड यांच्या निकटवर्तीयांसी संपर्क साधून भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.आमच्या सोबत राजकीय हातमिळवणी करा,बदल्यात महामंडळाचे अध्यक्षपद भूषवा,अशी ऑफर देण्यात आली आहे.किसनभाऊ राठोड यांनी तीऑफर नाकारल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्याचे कॅबिनेट मंत्री दिले जाईल अशी ऑफर देण्यात आली आहे,अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
किसनभाऊ साठी कोणतेही मंत्रिपद घेणे अवघड नाही.कारण भाऊ मुळे दहा ते पंधरा आमदार बंजारा समाजाचे निवडून येवू शकतात व पक्षाचे ४० ते ५० आमदारांना निवडून येण्यासाठी बंजारा समाजाच्या मतदानाची निर्णायक ताकद चमत्कार राजकीय कुरुक्षेत्रावरील लढाईत दाखवु शकते.
बंजारा समाजातील सर्वार्थाने शक्तिमान नेते,दानशूर व्यक्ती एखाद्या पक्षासोबत सन्मानपूर्वक राजकीय वाटाघाटी करीत असेल तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. भविष्यातील प्रत्येक निवडणुकी मध्ये जातीय राजकारणाला महत्त्व येणार आहे.जिसकी जितनी संख्या भारी,उसकी उतनी भागीदारी या नितीचा अवलंब होणार आहे. मंत्रीमंडळात मंत्री पद स्वतः किसनभाऊ राठोड स्वीकारतात की बंजारा समाजातील इतर १०-१५ संघर्षशिल कार्यकर्त्यांना आमदार म्हणून निवडून आणून त्यांचा सन्मान करतात,हे नजीकच्या काळात कळेलच. परंतु ज्या समाजामध्ये बंजारा तिर्थक्षेत्र नऊ धामचे निर्माते, प्रसिद्ध उद्योगपती,मॅन पॉवर, मस्सल पॉवर,मिडिया पॉवर,लाखो चाहते,संघटनेचे हाजारो समर्थक,लाखो, सेवालाल भक्त,इत्यादी सामाजिक ताकदीने परिपूर्ण असलेला किसनभाऊ राठोड यांच्या सारखा मातब्बर नेता आहे,त्यांना आपल्या पक्षाकडे वळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षाची मोठी फळी जोमाने काम करत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला येत आहे.एकंदरीत किसनभाऊ राठोड यांना मंत्रिपद मिळाले तर, बंजारा समाजाची सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती होईल,यात शंका नाही..
