वंचित बहुजन आघाडीची गेवराई तालुका कार्यकारिणीची निवड.
तालुकाध्यक्ष पदी अजयकुमार गायकवाड यांची लागली वर्णी.
गेवराई / प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीची जुनी कार्यकारिणी बऱ्याच महिन्यांपासून बरखास्त करण्यात आली होती. अनेक महिन्यांच्या विलंबाने दि. ४ डीसेंबर २०२१ रोजी अखेर मध्यवर्ती कार्यालयाने एॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या स्वाक्षरीचे प्रसिध्दी पत्रक काढून गेवराई तालुका कार्यकारिणीच्या निवडीची घोषणा करण्यात आली यात तालुका अध्यक्ष पदी अजयकुमार पप्पु गायकवाड यांची वर्णी लागली आहे.तर उपाध्यक्ष पदी रेवन गायकवाड, किशोर चव्हाण, सुनिल धोतरे, महासचिव पदाची किशोर भोले यांच्याकडे पुन्हा जबाबदारी देण्यात आली, तसेच सहसचिव पदी शरद खापरे, बाबासाहेब शरणांगत, हर्षद शेख. संघटकपदी एकनाथ आडे, रंजित शिंदे त्याचबरोबर प्रसिद्धीप्रमुख सखाराम पोहिकर, ज्ञानेश्वर हवाले तर सदस्य पदी कृष्णा खेडकर व विलास वावधने यांची निवड करण्यात आली.
अजयकुमार पप्पु गायकवाड यांची अध्यक्ष पदी निवड झाल्याची माहिती कळताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पप्पु गायकवाड यांचा ठीकठीकाणी सत्कार करुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या गेवराई तालुका अध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अनेकांनी वशिलेबाजी करुन पद मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु तो फोल ठरला. सर्वांशी मनमोकळ्या पणाने वागणारे, कष्टकरी, शेतकरी, वंचितांच्या हकेला धावुन येणारे पप्पु गायकवाड यांची तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण झाली आहे.
अजयकुमार पप्पु गायकवाड हे भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष होते त्यावेळी पक्षवाढीसाठी अथक परिश्रम घेवुन गाव तिथे शाखा स्थापन केल्या होत्या तेंव्हापासून एॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जवळीक असून ते बाळासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत.
