गेवराई शहरात पाडवा संगीत महोत्सव आयोजित
गेवराई प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वर कल्याण सांस्कृतिक प्रतिष्ठान व गेवराई अर्बन बँकेच्या वतीने दि.४ शुक्रवारी रात्री सात वाजता शहरातील शास्त्री चौक नगर परिषदेच्या प्रांगणात पाडवा संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेवराई येथे गेल्या सात वर्षांपासून स्वर कल्याण सांस्कृतिक प्रतिष्ठान व गेवराई अर्बन बँकेच्या वतीने बलिप्रतिपदा पाडवा निमित्ताने पाडवा संगीत महोत्सव आयोजित करण्यात येतो.या महोत्सवाचे यावेळी आठवे वर्षे असून दि.४ शुक्रवारी रोजी रात्री सात वाजता शहरातील शास्त्री चौक, नगर परिषदेच्या प्रांगणात यावेळी भजनसम्राट प्रा.ओम बोंगाने ( मुंबई), भजनसम्राट प्रा. तुळशीराम आतकरे ( गुरुजी) यांची सुरेल संगीत मेजवानी शहरातील श्नोत्यांना मिळणार आहे. या भव्य अशा महोत्सवात तबला साथ पवन उधे, समीर कुलकर्णी,कल्पेश वखरे,हार्मोनियम साथ ज्ञानेश्वर मोटे,उत्तम ( नाना) मोटे, टाळध्वनी रामजी धोंडरे,राजाभाऊ काळे सह सह साथ ज्ञानेश्वर औटे,कृष्णा ठाकर,रामेश्वर सुपेकर,हरीओम आतकरे,भागवत सकार्डे,किरण मोटे,विनोद शेजुळ, प्रविण राऊत, कु.वैष्णवी करांडे, कु.ज्योती धनाडे तर पखवाज साथ भरत पठाडे,ओंकार कागदे यांची संगीत साथ लाभणार आहे. दरम्यान या भव्य बलिप्रतिपदा पाडवा महोत्सवाला सुप्रसिद्ध किर्तनकार डॉ अर्जुन महाराज जाधव, दिलिप महाराज घोगे, हभप विष्णु देवानंद भारती, अकृर महाराज साखरे, राजेंद्र म.वाघमारे, बळीराम म.औटे, ज्ञानेश्वर म.जाधव, कृष्णा चौधरी, संदिप खरात, महादेव म.गिरी, नामदेव म.शेकटेकर, विष्णूपंत म.लोंढे, शिवानंद म. शास्त्री, लक्ष्मण म.मेंगडे, नाना म. कदम, कृष्णा म.राऊत, शाहीर विलास सोनवणे, तीर्थराज म. पठाडे, गणेश म.बोचरे, कोळेकर म.हातगाव, शिवाजी आर्दड, सह आदि उपस्थित राहणार आहेत. शहरासह तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, महेश दाभाडे, उत्तम सोलाने, राम उदावंत, ज्ञानेश्वर चातुर, संपादक सुनील पोपळे, इंद्रजीत येवले, शेषराव शिंदे, विक्रम उधे, मदन पोटे, दादासाहेब घोडके, डॉ. मुरलीधर मोटे, पत्रकार सुनील मुंडे, रामेश्वर वादे, सुधाकर गोरे, बबनराव टेहळे, अरूण मस्के, डॉ अशोक काळे, नंदु काकडे, रमेश चाटे, मोहन काळे, परमेश्वर वाघमोडे, शिनु बेद्रे, सुभाष केरूळकर, लक्ष्मण उधे, सावळेश्वर गौरव सोहळा समिती गेवराई, श्नी सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट सावळेश्वर सह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
