महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील एकमेव "प्रकाश आधार"ब्लॉग१)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)लातूर३०) वर्धा३१) वाशीम३२)सांगली३३)सातारा३४)सिंधुदुर्ग३५)सोलापूर३६) हिंगोली

दरोडेखोरांचा थरार.....! कसा आला दरोडा उघडकीस...? कोण आहेत सिंघम...

दरोडेखोरांचा थरार.....! 
कसा आला दरोडा उघडकीस...?  कोण आहेत सिंघम...!

     मराठवाड्यात खळबळ उडवून देणाऱ्या....बॅन्क (पतसंस्था) दरोडा प्रकरणाचा धुराळा खाली बसायच्या आधीच, एका बहाद्दर पोलीस अधिकाऱ्याने सुतावरून स्वर्ग गाठला आणि थेट.....दरोडेखोरांच्या मुसक्या बांधल्या. दरोडेखोरांनी अगदी फिल्मी स्टाईलने बॅन्क लुटली...सही सलामत पोबारा ही केला. घटनेने मराठवाड्यातले पोलीस दल हादरले होते. समाजात ही भितीचे वातावरण निर्माण झाले होते. थरकाप उडवून देणारी घटना...दरोडेखोरांनी सुरूवात केली आणि शेवट अर्थातच पोलीसांनी...क्यूं की..पोलीस के हात.....! 

अशी घडली घटना...! 
शहागड ता. अंबड जि. जालना येथील बुलडाणा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईलने बंदुकीचा धाक दाखवून रोख रक्कमेसह जवळपास तीन चार कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची थरारक घटना गुरुवारी ता. 28 रोजी दिवसा पाचच्या सुमारास घडली होती. औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रहदारीच्या रस्त्यावर भर दिवसा घडलेल्या या घटनेने मराठवाड्यात खळबळ उडाली होती. दरोडेखोरांनी  कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवून लूट करुन पोबारा केला. घटना आणि आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले होते. अवघ्या काही मिनिटांत दरोडा टाकून दरोडेखोर सहीसलामत पसार झाले होते. थरकाप उडवून देणारी घटना पोलीसांना आव्हान होते.

दरोडेखोरांची एन्ट्री....! 
      शहागड राष्ट्रीय महामार्गावरचे गाव आहे. जवळपास बाजार पेठेची गावे आहेत. कै. अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना आहे. त्यामुळे, शहागड व्यापार उद्योगाचे गावा आहे. या गावात बुलढाणा सहकारी पतसंस्थेची शाखा आहे. या बॅन्केत दिवसभर ग्राहकांची वर्दळ असते. त्यामुळे, दरोडेखोरांनी दुपारनंतरची वेळ चाॅईस केली असावी. बॅन्केत जायच्या आधी त्यांनी रेकी केली असणार, बॅन्केत कोणीच नाही; असे दिसताच तोंड झाकलेले तिघेजण हातात रिव्हॉल्वर घेऊनच बॅन्केत घुसले. आत येताच त्यांनी बंदुक रोखून धरली. अचानक घडलेल्या प्रसंगाने कर्मचाऱ्यांना काय करावे कळेना, भितीपोटी कर्मचारी हॅण्डसप च्या भूमिकेत उभे राहिले. सगळा प्रकार फिल्मीस्टाईल....! तीन दरोडेखोर आणि हाती बंदुका होत्या. सगळेच जीवावर बेतणारे होते. तेवढ्यात एक कर्मचाऱ्यारी बाहेर जाण्याच्या तयारीत होता. त्याला ही एका बंदुकधारी दरोडेखोराने बाजूच्या बाकड्यावर ढकलून बसवले. काहींना तोंडी धमक्या देत रिव्हॉल्वरचा धाक दाखवला. ते मराठीत बोलत होते. 
कार्यालयातल्या सर्व कर्मचाऱ्यांना एका रूममध्ये एक एक करून कोंडले. हा सर्व प्रकार पाच मिनिटात पूर्ण करून, पुढच्या पाच सहा मिनिटात नगदी रक्कम आणि सोने घेऊन दरोडेखोरांनी पसार झाले. सगळा खेळ दहा पंधरा मिनिटाचा होता. 
जीव मुठीत धरून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी दरोडेखोर गेल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर, पोलीस अधिकारी व बॅन्केच्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. घटना व्हायरल होताच खळबळ उडाली होती.

ते कितीदा तरी आले अन गेले...! 

   चोरी लपत नाही, ती उघडी पडतेच. चोरीला कसेही आणि कधीही पाय फुटतात. शहागड चा दरोडा तर आपल्याच "शिवावर" केलेली चोरी होती. केली तर केली, ती ही शेजारीच !  गमंतीची गोष्ट म्हणजे, 
हे दरोडेखोर बॅन्केत कितीदा तरी आले आणि हात हलवत माघारी गेल्याची माहिती मिळाली. ते बॅन्केत आले की, त्यांना कोणी ना कोणी ओळखायचे...! नमस्कार, काय कस काय चाललंय ?  आणि मग हे सुद्धा नमस्कार चमत्कार करून आले तसे निघून जायचे. असे अनेकदा झाले. डाव फसत गेला. नियतीने त्यांना पून्हा पून्हा अरे नकारे.....म्हणून "चानस" दिला. पण, हे पठ्ठे थांबायचे नावच घेईनात, बॅन्क त्यांना खुणावत होती. ठरले....! तारीख वेळ निश्चित झाली. आता काम फत्तेच करायच्या या हेतूने त्यांनी बॅन्केत दरोडा टाकलाच. काम फत्ते ही झाले. मोठा डल्ला हाणून ते गायब झाले होते. 

कसा आला दरोडा उघडकीस...?  कोण आहेत "ते" सिंघम...!

    हर्षद मेहता आठवतो का ? स्टॅम्प घोटाळ्याचा सूत्रधार, आरोपी. हजारो कोटीच्या घोटाळा प्रकरणात 
ते प्रमुख आरोपी होते. कसा आला होता तो घोटाळा उघडकीस. कोणी आणला तो समाजा समोर ? शोध पत्रकारितेचा तो आदर्श नमुना होता. श्रीमती सुचेता दलाल , शोध पत्रकारिता करणाऱ्या या मराठमोळ्या
महिलेने हा घोटाळा उघडकीस आणला होता. पत्रकारितेत एक ब्रीद वाक्य आहे. "शोधा म्हणजे सापडेल". दलाल यांनी जवळपास महिनाभर बातमीचा अभ्यास केला. अगदी खोलवर जाऊन त्याची पाळेमुळे खणून काढली. त्याची पडताळणी केली. त्यांची पत्रकारितेतली प्रमाणीकता, मराठी आणि इंग्रजीवरचे प्रभुत्व, बातमीच्या कामी आले. त्यांनी शोधलेले सोर्स, काॅन्टॅक्ट उपयोगी आले आणि देशाची लूट करणारा महाघोटाळा जगासमोर आला. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की, एखादा प्रश्न आपण किती तळमळीने हाताळतो, त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. उदाहरणार्थ, शहागड येथील बॅन्केचा थरारक दरोडा...! अवघ्या चोवीस तासात या प्रकरणाचा छडा लागला. वास्तविक पहाता, गेवराई च्या हद्दीतले हे प्रकरण नव्हते. अंबड तालुका आणि जालना  जिल्ह्य़ातील हे प्रकरण होते. शहागड आणि गेवराई चे अंतर फक्त 12 किमी आहे. कर्तव्यात प्रमाणीकपणे काम करणाऱ्या गेवराई च्या बहाद्दर पोलीसांनी हे महत्वाचे प्रकरण उघडकीस आणले आहे. विशेष कौतुक म्हणजे, संदीप काळे हे शिक्षक होते. उपनिरीक्षक म्हणून  संधी मिळाल्याने ते पोलीस दलात दाखल झालेत. गेवराई शहरात त्यांचे चांगले काम आहे. एका वयोवृद्धास आत्महत्या करताना वाचवले आहे. त्यासाठी गुढघाभर चिखलात जावून त्यांचा शोध घेतला आणि एक जीव त्यांनी वाचवला. रांजणी ता. गेवराई जवळ एक महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा छडा लागणे कठीण होते. काळे यांनी हा तपास कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळून त्या घटनेचा ही तपास लावला. माणूस डॅशिंग आहे. समाजात त्यांचा वावर आहे. त्यांना गेवराई रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. उत्तम समन्वय ठेवून कार्यरत आहेत. पोलीस दलात काम करताना काॅन्टॅक्ट, सोर्स असावे लागतात. त्यांचा थांगपत्ता कोणालाही लागू देता, काळजी घेऊन काम केले तरच असे अधिकारी यशस्वी होतात. शहागडच्या घटनेने त्यांची प्रतिमा आणखीन उजळली आहे. 

असा लागला छटा...! 

     शहागड च्या दरोड्याने मराठवाड्यातली पोलीस ठाणी हादरली होती. रक्कम थोडी नव्हती, 
तीन चार कोटी च्या घरात होती. त्यामुळे, हा दरोडा पोलीसांना आव्हान होते. दरोडेखोरांनी दिवसा डाका टाकला होता. घटनेने चक्रावून गेलेल्या पोलीसांनी "चक्रे" हलवली. एवढा मोठा दरोडा म्हणजे ते सराईत गुन्हेगार असणार, असा प्राथमिक अंदाज लावून पोलीस दलाने तपासाला गती दिली. घटनेच्या दुसर्‍याच दिवशी पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे हे त्याच दरोड्या संदर्भात सहकार्‍यांशी चर्चा करत असताना त्यांना एक फोन आला, तसे ते सतर्क झाले. एका खबऱ्याने "क्लू" दिला. तारीख होती 29 .10.2021 ...! दुपारचे दोन वाजले होते. काळे सरांनी गाडी काढली अन सुरू झाला दरोडेखोरांचा पाठलाग. प्रवासात 
सीसीटीव्ही फुटेज पून्हा पून्हा तपासले. चोरांची देहबोली, त्यांचे राहणीमान, रंग, रूपाची बारकाईनं माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेज बारकाईने बघीतल्यावर काही बाबी  निदर्शनास आल्या. दरोडेखोर सराईत नव्हते. हे ही दिसले. ते जसे आत आले तसे ते अॅक्शन मोडवर होते. त्यांच्या हातात रिव्हॉल्वर होती. त्यांनी थेट रिव्हॉल्वर रोखली. धमकावणे सुरू ठेवले. मराठीत बोलत होते. या भाषेच्या माध्यमातून ही पोलीसांनी अंदाज लावून तपास केला. दरोडेखोरांना बॅन्केचे मुख्य गेट ही बंद करायचे भान राहीले नाही. याचा अर्थ ते घाबरलेले होते किंवा ते नवीन होते. 
दोन तीन मिनिटांने एकाने इशारा करून दरवाजा बंद केला. गुन्हेगार सराईत दिसत नाहीत, हा धागा पकडून संदीप काळे यांच्या पथकाने तपासाला दिशा दिली. खबऱ्या मार्फत नव्या जून्या चोरांविषयी माहीती घेतली. हालचालींवर नजर ठेवली. त्यातून एक "क्लू" पोलीस अधिकारी संदीप काळे यांच्या हाती आला. पोलीसांनी फासे टाकले आणि दरोडेखोर अलगद अडकले. घटनेच्या मध्यरात्रीनंतर एका आरोपीच्या घरात भले मोठे पोते आल्याची पोलीसांना मिळालीच होती. त्यांच्या संशयित हालचाली. अंदाज खरा ठरतोय असे वाटायला लागले. पण, त्यातले कोणीही घरी नव्हते. एक ही आरोपी हाती लागेना. पोलीसांची घालमेल झाली. सात आठ तास उलटून गेले होते. तेवढ्यात एक खबर फोनवरून आली. तेव्हा रात्रीच्या आठ वाजले होते. दिवसभर जेवण नव्हते. जेवणाची वेळ झाली होती. एक तरी आरोपी हाती आला की, आधी यालाच जेवू घालू असा विचार करून, पोलीसांनी सापळा लावला. ठिकाण होते, बागपिंपळगाव जवळचा बायपास गेवराई..! बरोबर साठेआड वाजता एक गाडी पोलीसांनी अडवून विचारपूस केली. त्या दोघांची बोबडी वळली अन त्यांच्या मुसक्या बांधून गेवराई पोलीसांनी काम फत्ते केले.

चोरट्यांनी पोलीसांना रात्रभर फिरवले  ! 

पैसे कुठे आहेत. सोने कुठे ठेवले आहे. कोण कोण होत दरोडा टाकताना. कुठून आलात. कसे आलात. रिव्हॉल्वर कुठे आहे. अशी प्रश्नांची सरबत्ती लावून त्यांना बोलते केले. दरोडेखोर ही भलते चालू निघाले. पोलीस अधिकारी संदीप काळे आणि त्यांच्या टीमला रात्रभर पळवले. चोरीचा माल कधी टाकरवण, तेलगाव....कधी माजलगाव तर कधी बीडला ठेवलाय, अशा थापा मारून रात्रभर फिरवले. पण पैशाचा थांगपत्ता लागू देईनात. गोडी गुलाबीने तर ते ऐकेचना, पोलीस ही वैतागले होते. शेवटी, त्या दोघांनाही आणले गेवराईला. त्यांना साधी भाषा समजेना म्हणून मग पोलीसांनी खास पाहुणचार केला. निरव शांततेचा भंग होताच, दोघांनाही पोपटा सारखी वाचा फुटली. पैसे आणि सोने बीडच्या दुकानात ठेवल्याचे एका दमात सांगून टाकले. त्यातले एक दीड लाख त्यांनी उडवले आहेत. पाच लाख कोणाला तरी व्याजाने दिलेत. उर्वरित रक्कम, मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. ता. 29.10 .2021, पहाटचे साडेपाच वाजले होते. पोलीसांनी दरोडेखोर आणि दरोड्यातल्या रक्कमेचा यशस्वीपणे छडा लावला. सिंघम ठरले.....गेवराई पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप काळे...! एडीया उठानेसे कुछ नही होता. किरदार उंचे होणे चाहीए...! चोवीस तासाच्या आत दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या गेल्या. शहागड दरोडा प्रकरणातील आरोपी मुकीम उर्फ मुस्तफा कासम, रा. गेवराई जि.बीड 
आणि संदीप बबन सोळंके,रा. बीड. या दोघांना अटक करण्यात आली असून अन्य एक आरोपी फरार आहे.
 खरय की नाही, पोलीस के हात लंबे होते है..! गेवराई पोलीसांचे अभिनंदन.

सुभाष सुतार 
(पत्रकार)