छत्रपती मल्टीस्टेटचा 100 कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण
जिल्ह्यातील ग्राहकांमुळेच हे शक्य -- संतोष भंडारी
गेवराई ( प्रतिनिधी) येथील सहकार क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या छत्रपती मल्टीस्टेटने अवघ्या साडे पाच वर्षात 100 कोटींपेक्षा अधिक ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. बीड जिल्ह्यातल्या विशेषतः गेवराई तालुक्यातील ग्राहकांनाच याचे श्रेय जात असल्याचे मत चेअरमन संतोष भंडारी यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील, आठ जिल्ह्यात 21 शाखांच्या माध्यमातून छत्रपती मल्टीस्टेटचा कारभार आज यशस्वीपणे सुरू आहे. हजारो युवकांना रोजगार उपलब्ध करून देत ग्राहकांमध्ये आपल्या पारदर्शकतेची वेगळी छाप छत्रपती मल्टीस्टेटने टाकली आहे. यामुळेच अवघ्या साडे पाच वर्षात 100 कोटींपेक्षा अधिक ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. आज मित्तिला 65 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले असून, येत्या 31 मार्च पर्यंत 150 कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करणार असल्याचा विश्वास चेअरमन संतोष भंडारी यांनी व्यक्त केला आहे. बीड जिल्ह्यातील विशेषतः गेवराई तालुक्यातील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर छत्रपती मल्टीस्टेट परिवारावर विश्वास दाखवल्याने शंभर कोटीं ठेवींचे टार्गेट आपण पूर्ण करू शकलो असे सांगून, याचे पूर्ण श्रेय ग्राहकांना जात असल्याचे मत चेअरमन संतोष भंडारे यांनी व्यक्त केले आहे.
